Pune Ganeshostavपुण्यात गणेशोत्सव होणार निर्बंधमुक्त, प्रशासन सकारात्मक, पोलिस प्रशासनाला महापौरांची सूचना .

Pune Ganeshostav : गणेसोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, तुम्ही कार्यकर्त्यांना सोबत घ्या असा सल्ला महापौर मंजूषा नागपुरे यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. त्याचवेळी आगामी गणेसोत्सव निर्बंधमुक्त करण्यासंदर्भातही प्रशासनाने सकारात्मक दर्शविली आहे.

पुणे : 25-08-2026

गणेशोत्सव मंडळांच्या (Pune Ganeshostav) कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, तुम्ही कार्यकर्त्यांना सोबत घ्या असा सल्ला महापौर मंजुषा नागपुरे यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. त्याचवेळी आगामी गणेशोत्सव निर्बंधमुक्त कऱण्यासंदर्भातही प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. दरवर्षी प्रमाणे पुणे महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात महापालिका भवनात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला महापौर नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, सह पोलिस आयुक्त संजय दराडे आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परवानगी, स्पीकर, झाडांच्या फांदी छाटणी, वीज पुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, विसर्जन मिरवणुक, गर्दीचे नियोजन आदी विषयांवर प्रशासनाने लक्ष वेधले.

महापौरांनी मांडली भूमिका  (Pune Ganeshostav)

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा संदर्भ घेत, महापौर नागपुरे यांनी गणेसोत्सव निर्बंधमुक्त कऱण्याविषयी स्पष्ट भुमिका मांडली. त्या म्हणाल्या, ” गणेशोत्सवासाठी नियमावली निश्चितच असली पाहिजे, परंतु निर्बंध असता कामा नये. तसेच यावेळी गणेशोत्सवाचे ‘डिजिटल मॅपिंग’केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाने नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक गणेश मंडळाची माहिती नागरिकांना सहज मिळणे शक्य होणार आहे. पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांनी केलेल्या तक्रारीनुसार गर्दीचे नियोजन कऱणे आवश्यक आहे. ठराविक मंडळाकडे भाविक जाणार नाहीत अशा पद्धतीने नियोजन न करता, सर्व भागात भाविक जाऊ शकतील असे नियोजन कऱणे आवश्यक आहे.

पोलिसांकडून एक खिडकी योजना  (Pune Ganeshostav)

सह पोलिस आयुक्त दराडे यांनी यावर्षीचा गणेशोत्सव हा बारा दिवसांचा असल्याचे नमूद करीत, गौरी विसर्जन, 7 वा, 9 वा, 11 वा आणि अनंत चतुर्दशी या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर, पारंपरिक वाद्य वाजविण्याची मुभा दिली असल्याची माहिती दिली. तसेच पोलिसांकडून यावर्षी देखील परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे, असे सांगितले. तसेच ‘प्लाझा, लेझर सारख्या घातक साहित्याचा वापर कऱण्याच्या गणेश मंडळांच्या भुमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे (Pune Ganeshostav)

प्रत्येक क्षेत्रित कार्यालय स्तरावर गणेश मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘नोडल अधिकारी ‘ नियुक्त करणार

महापालिकेच्या ठेवींचा गणेश मंडळांसाठी वापर कऱण्याची धीरज घाटे यांची सुचना

गणेश मुर्तींची उंची, आगमनाची वेळ, मार्ग याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास कळविण्याची सूचना

गणेसोत्सवाच्या पार्श्वभूमिवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार

जाहिरातींवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कोणत्याही स्टॉलवर कारवाई केली जाणार नाही.

ध्वनी प्रदुषणावरून पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्ते यांच्यात वाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!