Khavdya Dongar Death खवड्या डोंगरावरून वडील-मुलगा आणि आईचा दुर्दैवी मृत्यू, एका वादामुळे कुटुंब उद्धस्त .

Khavdya Dongar Death : संभाजीनगरच्या रहिवाशी असणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. कुणाल चांदगुडे या तरूणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचे पाऊल उचलले. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. आता याबाबत मोठे खुलासे होत आहे.

 छत्रपती संभाजीनगर : 22-08-2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. कुणाल चांदगुडे ( Khavdya Dongar Death)  या तरूणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचे पाऊल उचलले. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. एका क्षणात अख्खं कुटुंब उद्धस्त झाल्याने संपू्र्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयफोन खरेदीच्या हट्टापायी ही घटना घडली असे सुरूवातीला सांगण्यात येत होते.

मात्र या घटनेमागचे सत्य वेगळे आहे. कुणालला खवड्या डोंगरावरून उडी मारायचीच नव्हती अशी माहितीही आता समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कुणालला जीव द्यायचाच नव्हता ( Khavdya Dongar Death)

कुणालच्या मावस काकांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणातून छोटा-मोठा वाद होत होता. आई-वडीलांनी भांडू नये, त्यांना भीती दाकवून वाद थांबवावा, या उद्देशाने कुणाल डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यांचा अंत झाला. त्यानंतर कुणालच्या आईनेही डोंगरावरून खाली उडी मारून जीव दिला.

वडील कुणालवर रागावले होते ( Khavdya Dongar Death)

कुणालच्या मावस काकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात छोटे-मोठे वाद होते. कुणालला वाटायचं की वाद नको व्हायला. काही कारणामुळे वडील पण त्याच्यावर थोडे रागावले होते. वाद होऊ नये म्हणून भीती दाखवण्याच्या नादात हे झाले. त्याला पण असे करायचे नव्हते, मात्र पकडण्याच्या नादात घटना घडली आणि त्या तिघांचा दुर्देवी अंत झाला अशी माहिती आता समोर आली आहे.

खवड्या डोंगरावरून आतापर्यंत 13 जणांनी उडी मारून जीवन संपवलं आहे. या ठिकाणी एक खुनाची घटना झाल्याचेही समोर आले आहे. गतवर्षी एकाने त्याच्या बहिणीला कड्यावरून ढकलून दिल्याची घटनाही घडली होती. मात्र, या घटना अधूनमधून होत असल्याने हा डोंगर फार चर्चेत नव्हता. पण काल चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खवड्या डोंगर चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!