Rahul Gandhi Pune 'महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरूद्ध, पुण्यात राहुल गांधी गरजले.

Rahul Gandhi Pune : पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हजारो तरूणींशी संवाद साधला. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली असल्याचा दावा करत त्यांनी महिलांच्या स्वातंत्र्य, समान हक्क आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.

पुणे : 22-08-2026 

राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ (Rahul Gandhi Pune)  हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छात्रों की गुंज कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप राजनैतिक न ठेवता संवादात्मक ठेवले होते.

राहुल गांधी यांचे दुपारी पुण्यात आगमन झाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह नेते व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज कार्यक्रमात मुलींशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.

भाजप आणि आरएसएस विचारसरणीचे लोकं स्रियांनी पिंजऱ्यातच रहावे या मानसिकतेचे (Rahul Gandhi Pune)

” भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित लोक मुली आणि स्रिया पिंजऱ्यातच बंदिस्त राहाव्यात या मानसिकतेचे आहेत पण असा भारत आपल्याला नको आहे. आपल्याला अशी व्यवस्था हवी आहे तिथे प्रत्येकाशी आदराने वागले जाईल. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘ मनुस्मृती’तून आली आहे आणि आज आपला लढा याच मानसिकतेविरूद्ध आहे ” अशा घणाघात हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्याच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात केला.

” हजारो वर्षांपासून महिलांना त्यांचे हक्क नाकारण्यात आले ”  (Rahul Gandhi Pune)

राहुल गांधी यांनी यावेळी देशातील महिलांच्या स्थिती बद्दल भाष्य करत त्यांचे हक्क कसे नाकारले जात आहेत ते सांगितले. ते म्हणाले की, ” हजारो वर्षांपासून देशात महिलांंना त्यांचे हक्क व अधिकार नाकारण्यात आले, मनुस्मृती महिलांना स्वतंत्र असू नये असे म्हणते पण महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे,त्यातच मोठी ताकद आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःची ओळक निर्माण केली पाहिजे. मुलीचे वडील, भाऊ, पती किंवा मुलगा यांच्याशी नाते असून शकते, पण त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्या स्वतःच्या आहेत.” असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.

महिलांवरील हिंसाचाराची आकडेवारी सादर (Rahul Gandhi Pune)

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ” समाजात महिलांना प्रगती करण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला जातो. या हिंसाचाराचे तीन प्रकार आहेत : शारिरिक हिंसाचार-दरवर्षी 4.5 लाख स्री-भ्रूणहत्या केल्या जातात. 80 % महिलांना छळाचा सामना करावा लागतो. 29 % महिला शारिरिक हिंसाचाराला बळी पडतात.

6 % महिलांवर बलात्कार होतो. संधी नाकारणारा हिंसाचार सुरक्षिततेच्या नावाखाली 50 % महिलांना शिक्षण किंवा रोजगाराच्या संधी नाकारल्या जातात. आर्थिक हिंसाचार-सुरक्षित प्रवासाच्या नावाखाली दरवर्षी अतिरिक्त 17,500 रुपयांचा खर्च करावा लागतो. देशात महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रक ठेवले जाते.”

” हालचाल किंवा वावरण्याचे स्वातंत्र्य : 60% महिला एकट्या घराबाहेर जाऊ शकत नाहीत. निर्णय स्वातंत्र्य / निवड : 45 % महिलांना लग्न किंवा घरगुती जबाबादाऱ्यांमुळे शिक्षण किंवा काम सोडावे लागते. आर्थिक अधिकार : केवळ 8 % महिलांकडे जमिनीची मालकी हक्क आहेत. आपल्या देशात अनादर किंवा अवमानाची विविध रुपे दिसून येतात.

सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे लैंगिक हिंसाचाराच्या 99 % घटनांची नोंदच केली जात नाही. 84 % महिलांना नोकरी करण्यासाठी आपल्या कुटुंबाची परवानगी घ्यावी लागते. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न 25 % कमी असते आणि त्यांना सहजपणे पदोन्नती मिळत नाही.”

” जेव्हा मी पुरूषांशी बोलतो, तेव्हा मला असे आढळते की स्रियांना अनेकदा केवळ तीन चौकटीत पाहिले जाते, मुलगी, पत्नी किंवा आई. यापैकी कोणत्याही भूमिकेत काहीही गैर नाही पण या तुमच्या एकमेव ओळखी असू शकत नाहीत. स्रिया या व्यावसायिक, खेळाडू, नेत्या, निर्मात्या, उद्योजिका अशा अनेक भूमिका निभावण्याऱ्या असतात. तरीही, अनेकदा त्यांची ओळख केवळ एखाद्या पुरूषाशी असलेल्या नात्यावरूनच ठरवली जाते.” असे राहुल गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!