Airport Gold Smugglingदिल्ली विमानतळावर सोने स्मगलिंगचा भांडाफोड, कुकरच्या शिट्टीत लपवले 1 कोटींचे सोने.

Airport Gold Smuggling : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोन्याच्या तस्करीचा प्रकार उघड केला. प्रवाशाने कुकरच्या शिट्टीत 1 कोटींचं  सोनं लपवण्याचा प्रयत्न केला होता.

दिल्ली : 20-08-2026

सोन्याची तस्करी करताना आरोपी अनेकदा वेगवेगळ्या पद्धती वापरतात. दिल्ली विमानतळावरही (Airport Gold Smuggling) अशीच एक आगळेवेगळी तस्करी पकडण्यात आली आहे. या तस्करीविषयीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आरोपीने 1 कोटी किंमतीचे सोने एका कुकरच्या शिट्टीत दडवून ठेवण्याचे दिसले. नव्या कोऱ्या कुकरच्या शिट्टीत सोने लपवून सोन्याची सहज तस्करी करता येईल असे आरोपीला वाटले. मात्र सजग अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब निसटली नाही. आणि हे प्रकरण उघडकीस आले.

कुठे लपवले सोने (Airport Gold Smuggling)

भांड्यांमध्ये लपवून ही चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तीन झाकणांमध्ये 523 ग्रॅम सोने लवपवून ते दिल्ली ला आणण्यात आले होते. हा तस्कर रियाधहून मुंबईमार्गे दिल्लीत आला होता. सामानामध्ये संशयित वस्तू आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि दडवलेल्या सोन्याचा छडा लावला. अधिकाऱ्यांनी तस्कर जवळून अर्ध्या किलोहून अधिकचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई इंदिरा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल 1 वर कस्टम विभागाने केली.

1 कोटी सोने जप्त (Airport Gold Smuggling)

एक्सरे चेकिंगमध्ये संशयास्पद फोटो दिसून आल्यानंतर यात्रेकरूंची सखोल चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान कुकरच्या झाकणातील शिट्टीत मोठ्या शिताफिने 24 कॅरेट सोन्याचे 15 तुकडे लपवलेले आढळले. अधिकाऱ्यांनी हे सोने जप्त केले असून या लपवलेल्या सोन्याचे एकूण वजन 523 ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे.

कस्टम विभागाला मिळाली होती माहिती (Airport Gold Smuggling)

कस्टम विभागाला आधीच एक संदेश मिळाला होता. माहिती आणि प्रोफाइलिंगच्या आधारे, कस्टमने क्रमांक 6E-315 मधून प्रवास कऱणाऱ्या एका प्रवाशाला ताब्यात घेतले. ही तस्करी कुणाच्या सांगण्यावरून आणि कुठून केली जात आहे हे शोधून काढण्याचे काम सध्या कस्टम विभाग करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!