Rahul Gandhi Andolanराहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गन प्रकरणात FIR दाखल कऱण्यास दिल्ली पोलिसांची तयारी.

Rahul Gandhi Andolan : गेल्या महिन्यात झालेल्या 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान पेलेट गनने जखमी झालेल्या साहिल लोचवच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे दिले. अखेर दिल्ली पोलिसांनी FIR दाखल कऱण्याची तयारी दर्शवली.

दिल्ली : 21-08-2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनचा वापराचा आरोप झालेल्या प्रकरणावरून कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi Andolan) यांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी साहिल लोचव याच्यासोबत राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांच्या प्रमुख मागणीमध्ये या प्रकरणात FIR दाखल करून दोषींवर कारवाई करणे याचा समावेश होता.

20 जुलै रोजी जंतर मंतर संसदेकडे काढण्यात आलेल्या विद्यार्थी मोर्चादरम्यान पोलिसांकडून पेलेट गनचा वापर झाल्याचा आरोप कऱण्यात आला होता. या घटनेत साहिल लोचवसह काही विद्यार्थी जखमी झाले. साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी सुरूवातीला आंदोलकांवर पेेलेट गनचा वापर केल्याचा आरोप नाकारला होता.

अखेर दिल्ली पोलिसांची FIR दाखल कऱण्याची तयारी (Rahul Gandhi Andolan)

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार कऱण्याची मागणी केली. पोलिसांकडून तत्काळ FIR दाखल न झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर धरणे सुरू केले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठेर कारवाईची मागणी केली.

राहुल गांधी यांच्या धरण्यानंतर (Rahul Gandhi Andolan) अखेर दिल्ली पोलिसांनी तक्रारीवर FIR दाखल करण्याची तयारी दर्शवली. उपलब्ध माहितीनुसार, साहिल लोचवच्या पेलेट गन दुखापतीच्या तक्रारीवर FIR नोंदवण्यात आल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी आधीपासूनच सुरू होती. पेलेट गन किंवा अन्य गर्दी नियंत्रणाच्या साधनांचा वापर झाला का, यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी CRPF माहिती मागवली होती. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनातील कथित पोलिसी कारवाईचा मुद्दा आता आणखी गंभीर बनला आहे.

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi Andolan) या आंदोलनामुळे विद्यार्थी आंदोलनातील कथित पेलेट गन वापराचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय पातळीवर चर्चेच आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!