Blinkit FDA Action : मुंबईत FDA ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkit च्या मालाडमधील डार्क स्टोअरवर कारवाई केली आहे. तपासणीत अस्वच्छता, झुरळे आणि एक्सपायर फूड स्टॉक आढळल्यानंतर स्टोअरचा फूड लायसन्स निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई : 11-08-2026
मुंबईत FDA ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkitच्या मालाडमधील डार्क स्टोअरवर (Blinkit FDA Action) कारवाई केली आहे. तपासणीत अस्वच्छता, झुरळे आणि एक्सपायर फूड स्कॉक आढळल्यानंतर स्टोअरचा फूड लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंक इट’च्या एका गोदामातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे.
कंपनीने मालाड वेस्ट मधील डार्क स्टोअरचे फूड लायसन्स सस्पेंड केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान स्टोअरमध्ये असंख्य झुरळं, एक्सपायर फूड स्टॉक आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. विभागाने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई फक्त एका स्टोअरवर कऱण्यात आली असून ब्लिंकिटच्या संपूर्ण फूड ऑपरेशनला निलंबित करण्यात आलेलं नाही.
अनेक मोठे ब्रॅंडस आणि हॉटेल्सवर कारवाई (Blinkit FDA Action)
महाराष्ट्र फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने (FDA) अलिकडेच अनेक मोठे ब्रँडस, हॉटेल्स आणि फूड स्टोअर्सवर धडक कारवाई केली आहे. विभागाने इतके फूड सँपल्स जमा केले आहेत की, त्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांकडून रविवारी देखील काम केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएने ऑगस्ट रोजी मालाड वेस्टमधील रामचंद्र लेनमध्ये असलेल्या कंपनीच्या दुकानाची तपासणी केली होती.
विभागाने दावा केला आहे की, तपासणीदरम्यान स्टोअरमध्ये ठेवण्यात आलेल्या भाज्या आणि फळांमध्ये झुरळे आढळून आली. जागा अत्यंत अस्वच्छ असल्याचे सांगून एफडीएने तत्काळ स्टोअरचा परवाना निलंबित केला आहे. या निलंबनादरम्यान स्टोअरमधील खाद्यपर्दार्थांची विक्री, वितरण किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली होती.
हजारो डेअरी प्रॉडक्टस केले जप्त (Blinkit FDA Action)
एकामागोमाग एफडीएच्या छापांचा हा घटनाक्रम सुरू असतानाच 8 ऑगस्ट रोजी बुलढाणा एआरडी सिनेमॉलमध्ये असलेल्या रिलायन्सच्या एका रिटेल आऊटलेटचीही तपासणी करण्यात आली. ही तपासणी एका खास ब्रँडच्या काजू कतलीत बुरशी आणि जिवंत किडे आढळल्याच्या तक्रारीच्या आधारे कऱण्यात आली होती. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी त्याच प्रकारच्या दुसऱ्या बॅचमधून 10,238 रुपये किंमतीची 11.34 किलो काजू कतली तप्त केली आणि नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.
याव्यतिरिक्त दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्समधील भेसळीविरोधात अभियान देखील सूरू कऱण्यात आले आहे. या स्पेशल अभियानादरम्यान 14,378 लीटर प्रॉडक्ट्स जप्त करण्यात आले ज्यांची किंमत 93.26 लाख रुपये असल्याची माहिती आहे. एफडीएने याआधी भिवंडी येथील ॲमेझॉनच्या वेअरहाऊसवरही छापा टाकला होता. हे प्रकरण सध्या मुंबई हायकोर्टात सुरू आहे.