Tukaram Mundhe On Cockroch : आयएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत असतात. त्यांनी सध्या असेच एक विधान केले, आणि प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुणे : 08-08-2026
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe On Cockroch )नेहमी चर्चेत असणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या राज्यात त्यांनी अन्न व औषध विभागातर्फे अनेक ठिकाणी भेसळविरोधी कारवाई करत एकच खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मात्र ते आपल्या कारवाईमुळे नाही तर, एका विधानामुळे चर्चेत आले आहे.
त्यांनी ‘कॉकरोच’ वर अशी एक प्रतिक्रिया दिली, की प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
काय म्हणाले मुंढे ? (Tukaram Mundhe On Cockroch )
‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमाअंतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत घेतली. यावेळी बोलताना तुकाराम मुंढे यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. प्रशांत अहिरे यांनी या मुलाखतीदरम्यान कॉकरोचवर प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर तुकाराम मुंढे यांनी एका वाक्यात दिले, आणि उपस्थितांची मने जिंकली.
प्रशांत अहिरे यांनी विचारले की, तुम्ही उच्च न्यायालयाच्या कँन्टिनवरही छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान एखादा कॉकरोच निघाला तर त्याला काय होतं, असं कँन्टिनचा मालक म्हणाला नाही का ?
यावर बोलताना, मुंढे म्हणाले की. ‘कॉकरोच काय असतं हे आपल्याला पाठीमागच्या काही दिवसांत कळलं आहे.कॉकरोचच असं आहे की, त्याला कुठेही फेका तो तिथेच जन्म घेतो, ‘ असं खुमासदार उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच पुढे बोलताना उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर झालेली छापेमारी ही न्यायालयाच्याच निर्देशानुसार होती, असंही त्यांनी स्पष्ट केले.
‘अटेंन्शन स्पॅन’ अवघ्या सेकंदाचा झाला. (Tukaram Mundhe On Cockroch )
तुकाराम मुंढे यांनी पुढे तरूणाईलाही काही मोलाचा सल्ला दिला. ‘फक्त यशाकडे पाहू नका, तर अपयशातूनही शिकण्याचा प्रयत्न करा. कोणाचे अंधानुकरण करू नका, तर प्रत्येकाकडून चांगले गुण शिका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरूण पिढीचा ‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला आहे आणि स्क्रिन टाइम 8-9 तासांवर गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रिल्स स्क्रोल करू नका, तर विचार करा. कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. परिस्थिती कशीही असली, तरी तुमचे भविष्य हे तुम्ही आज घेतलेल्या निर्णयावरच अवलंबून असते,’ असा मोलाचा संदेश तुकाराम मुंढे यांनी दिली.