Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा देत अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट लागू केला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : 31-07-2026
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अशातच आता हवामान विभागाने अलर्ट जाहीर केला आहे. पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावासाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया या विदर्भातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. या भागांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून कऱण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे रेड अलर्ट ? (Maharashtra Rain Update)
पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. याशिवाय ठाणे, रायगड, धुळे, जळगावसह पालघर, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपची संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पूरस्थिती (Maharashtra Rain Update)
अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. वाढत्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठी वस्ती असलेल्या 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गावांमध्ये सर्वत्र पाणी साठले आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट लागू (Maharashtra Rain Update)
यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यांताली सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.