Ashwini Bhide Mumbai Rain News, 2026 : धरण क्षेत्रात आजदेखील चांगला पाऊस पडतोय. 1 टक्के धरण क्षेत्रात पाणी वाढतं तेव्हा एक दिवस पाणी पुरतं. मुंबईत खुप मोठा पाऊस पडला आहे. आता पुढील काही दिवस पाऊस कमी आहे. त्यानंतर पाऊस चांगला आहे. त्यानुसार पाण्याचं नियोजन सुरू आहे, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले आहे.
मुंबई : 07-07-2026
जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईमध्ये (Ashwini Bhide Mumbai Rain News) अनेक ठिकाणी झाडपड़ीच्या घटना घडल्या. पाणी साठले. आमची यंत्रणा सज्ज आहे. पावसाळ्याआधीची सर्व कामे करण्यात आली आहेत, असे मुंबई महापालिकेकडून सांगितले जात होते. परंतु पहिल्या आठवड्याच्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
काही ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, आता या पावसामुळे मुंबईचे काय नुकसान झाले, मुंबईचे हे नुकसान नेमके का झाले ? याविषयीची सविस्तर माहिती महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. यावेळी झाडे तुटण्याच्या सर्वाधिक घटना का घडल्या, याची माहिती त्यांनी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी (Ashwini Bhide Mumbai Rain News)
अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुंबई शहऱातील पाणीपुरवठा आणि धरणांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पाणीसाठा चांगला झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. मात्र हा पाणीसाठा समाधानकारक आहे. 2024 सालच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला आहे. 2025 सालच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई शहरात समाधानकारक पाऊस पडला (Ashwini Bhide Mumbai Rain News)
धरण क्षेत्रात आजदेखील चांगला पाऊस पडतोय. 1 टक्के धरण क्षेत्रात पाणी वाढतं तेव्हा एक दिवस पाणी पुरतं. मुंबईत खूप मोठा पाऊस पडला आहे. आता पुढील काही दिवस पाऊस कमी आहे. त्यानंतर आणखी पाऊस चांगला आहे. त्यानुसार पाण्याचं नियोजन सुरू आहे.
जुलैच्या 1 तारखेपासून मुंबईत चांगला पाऊस पडतोय. जूनच्या सरासरी पावसाच्या प्रमाणात जुलैमध्ये चांगला पाऊस पडतोय. यावर्षी 2024 मिमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यापैकी 40 टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. मुंबई शहरात समाधानकारक पाऊस पडला आहे. पण धरण क्षेत्रात आणखी पावसाची गरज आहे, असेही भिडे यांनी स्पष्ट केले.
यावर्षी 1238 झाडांच्या फांद्या पडल्या (Ashwini Bhide Mumbai Rain News)
यावर्षीच पावसामध्ये वाऱ्यांच प्रमाण अधिक होतं. सगळ्यात जास्त नुकसान हे झाडांचं झालं आहे. जेवढी वर्षाला झाडं पडतात त्यापेक्षा 50 टक्के झाडं एका दिवसात पडली आहेत. या पावसाळ्यात वाऱ्याचा वेग जास्त राहिला आहे. जेवढी झाडं पडतात तेवढ्याच फांद्या पडतात. यावर्षी 1238 झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. झाडं पडल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नाले भरले तेव्हा मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं होतं, अशी माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.