Siya Goyal Ketan Agrawalकेतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड, सियाने उरकलं होतं हत्येआधीच बॉयफ्रेंडशी लग्न.

Siya Goyal Ketan Agrawal : केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र आता त्यांच्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : 07-07-2026

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील ( Siya Goyal Ketan Agrawal )मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचुप लग्न उरकले होते, असा दावा पोलिसांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉटसअप चॅटची तपासणी केली असता, त्यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा मोठा दावा करण्यात आला आहे.

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपासामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचुप लग्न केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या दोघांच्या व्हॉटसअप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कुटुंबापासून लपवून ठेवली लग्नाची गोष्ट  ( Siya Goyal Ketan Agrawal )

सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या चौकशीदरम्यान, तसेच त्यांच्या मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रिच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सहा ते सात महिन्यांतील डिजिट माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच गूपचूप विवाह केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्या दोघांनी कुटुंबियांपासून लपवून लग्न केलं होतं, असेही तपासात समोर आले आहे. हा विवाह केतन आणि सिया यांच्या 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र हे गुपचुप लग्न नेमकं साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर, हे स्पष्ट झालेले नाही.

केतनच्या हत्येआधी सियाने बघितल्या अनेक वेबसिरीज ( Siya Goyal Ketan Agrawal )

व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या खुूनातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहेत. दोघांनी केतनच्या खूनासाठी अनेक वेब सिरीज तसेच पॉजकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचेही समोर आले आहे.

लोहगडावरून ढकलून देऊन व्यावसायिक केतन अग्रवाल याचा होणारी पत्नी सिया गोयल व तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली. या प्रकरणात दोघांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्यामधील झालेले संभाषण तसेच चॅटींग यामधून वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींच्या मोबाईलमधील सहा ते सात महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली.

पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा याविषयीची माहिती घेतल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याबाबत आरोपींनी माहिती गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

चाकू किंवा इतर शस्र वापरून खून केल्यास पुरावे सहज मिळू शकतात आणि आरोपी पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता. या गोष्टी घेण्यासाठी कुठेना कुठे जावे लागेल, त्या सांभाळाव्या लागतील अथवा घटनेनंतर त्या लपवून ठेवाव्या लागतील. त्यामुळे कोणतेही शस्र न वापरता उंच कड्यावरून ढकलून देऊन खूनाचा निर्णय घेतल्याचे सियाने चौकशीत सांगितल्याता दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू केली आहे.

सिया आणि केतन आणि चेतन .. काय आहे प्रकरण ? ( Siya Goyal Ketan Agrawal )

18 जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती.

या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघानांही अटक केली आहे. सध्या हे दोन्ही आरोपी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या कोठडीदरम्यानच पोलिसांनी केलेल्या तपासात आणि व्हॉटसअप चॅटच्या छाननीतून त्यांच्या गुपचुप लग्नाची ही नवी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!