Tukaram Mundhe Action : अन्न व प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळयुक्त धाबे दणाणली आहेत. त्यामध्येच आता धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : 07-07-2026
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe Action) यांनी कारभार हाती घेतल्यापासून मोठ्या कारवाया राज्यभरात सुरू आहेत. अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि भेसळयुक्तांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवायांचा मोठा धसका लोकांनी घेतला आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये कारवाई होत आहे. भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत.
तुकाराम मुंडे यांच्याकडून आतापर्यंत राज्यातील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. आता धाराशिवमध्ये तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली आहे. भूममध्ये एफडीएची धडक कारवाई सुरू आहे. 2 लाख 11 हजाराची 1125 किलो दूध पावडर जप्त करण्यात आले.
धाराशिवमध्ये कारवाई (Tukaram Mundhe Action )
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. विनापरवाना साठवून ठेवलेली 1125 किलो दूध पावडर जप्त केली आहे. या कारवाईत 61 बॅगमधील सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांची मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईने मोठी खळबळ उडाली. ही दूध पावडर बाळासाहेब घोडके यांनी विनापरवाना साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भूम तालुका खवा, पेढा आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असून भेसळीच्या तक्रारींवरून अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणादणाले असून ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाखाली अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे. नाशिकमध्येही अशाचप्रकारची मोठी कारवाई करण्यात आली .
दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई (Tukaram Mundhe Action)
नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंडे यांनी आपला मोर्चा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. भेसळयुक्त दूध ग्राहकांना मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी आता दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना नवे नियम लागू केले जाणार असल्याचे मुंडे यांनी म्हटले होते.