UPSC Recruitmentयुपीएससीकडून विविध मंत्रालयांतील पदांसाठी भरती ; अर्ज कसा आणि कुठे करायचा पहा एका क्लिकवर.

UPSC Recruitment : केंक्र सरकारच्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये राजपत्रित (Gazetted) अधिकारी बनण्याची इच्छा आहे का ? UPSC  ने जाहीर केलेल्या 45 पदांसाठी तुमची निवड कशी होऊ शकते ? अर्ज कऱण्याची शेवटची तारीख काय आहे ?

दिल्ली : 12-05-2026 

सरकारची नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) ग्रुप ए आणि ग्रुप बी राजपत्रित पदांसाठी (UPSC Recruitment) भरती जाहीर केली आहे. विशष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांनी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे, या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 29 मे 2026 रोजी संध्याकाळी ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

विविध मंत्रालयांमध्ये भरती (UPSC Recruitment)

युपीएससीद्वारे प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या या जाहिराती अंतर्गत 45 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये खालील पदाचा समावेश आहे.

  • असिस्टंट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर (कन्नड भाषा)
  • क़ॉलेज ऑफ मिल्ट्री इंजिनिअरिंग पुणे येथे असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर
  • संरक्षण मंत्रालयात अनुवादक (चिनी आणि तिबेटी)
  • डीआरडीओमध्ये वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी ग्रेड- II
  • भारतीय खाण ब्युरोमध्ये सहाय्यक खाण अभियंता आणि सहाय्यक संशोधन अधिकारी
  • लडाख प्रशासन लेखा अधिकारी

यामध्ये सर्वाधिक 29 पदे डिआरडीओमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदासाठी आहेत तर इतर पदांसाठी एक-एक जागा रिक्त आहेत.

निवड प्रक्रिया आणि पात्रता (UPSC Recruitment)

  • निवड पद्धत : उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टींग, परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होईल.
  • वयोमर्यादा : पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 45 वर्ष ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सुट दिली जाईल.
  • वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल 7 ते 10 आणि शैक्षणिक स्तरावर 10 ते 13 A 1 नुसार पगार दिला जाईल.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आयोगाच्या अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!