JNU MBA Admission 2026 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मॅनेजमेंट शिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. 15 मे 2026 पूर्वी अर्ज करा. CAT स्कोअर, पात्रता आणि निवड प्रक्रियाबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.
नवी दिल्ली : 07-05-2026
जर तुम्ही देशातील एखाद्या प्रतिष्ठित विद्यापीठातून MBA कऱण्याचे स्वप्न पहात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) शैक्षणिक वर्ष 2026 -28 बॅचच्या MBA प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CAT 2025 परीक्षा दिली आहे आणि ज्यांना मॅनेजमेंटचे शिक्षण घ्यायचे आहे. ते या कोर्सेच्या प्रेवशासाठी आता ऑनलाईन अर्ज करू शकतात.
काय खास आहे JNU चा MBA कोर्स ? (JNU MBA Admission 2026)
JNU हे देशातील प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठांपैकी एक मानले जाते. येथील प्रोगॅम आधुनिक व्यवस्थापन, शिक्षण आणि उद्योजकता लक्षात घेऊन तयार कऱण्यात आला आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फक्त थिअरी शिकवली जात नाही तर त्यांना व्यावसायिक समस्या समजून घेण्याचे आणि त्यावर उपाय शोधण्याचे प्रसिक्षण दिले जाते.
तसेच शिक्षणादरम्यान येथे विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्ट आणि इंडस्ट्री व्हिजिट, बिझनेस केस स्टडीजच्या कार्यशाळा, सिम्युलेशन एक्सरसाईज, उद्योग तज्ञांची व्याख्याने यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
प्रवेशासाठी शेवटची तारीख काय आहे ? (JNU MBA Admission 2026)
JNU MBA 2026-28 बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक उमेद्वार 15 मे 2026 पर्यत ऑनलाईन अर्ज करू शकतात. CAT उत्तीर्ण उमेदवारांना आणखी एक संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने अर्जाची प्रक्रिया पुन्हा खुली केली आहे.
पात्रता काय आहे ? (JNU MBA Admission 2026)
उमेद्वाराकडे मान्यतापात्र विद्यापीठाची किमान 3 वर्षाची पदवी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे CAT 2025 च्या वैध स्कोर असणे अनिवार्य आहे. उमेद्वाराची निवड ही केवळ CAT स्कोरवर आधारित नसून विद्यापीठ विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि संवादकौशल्याची प्रत्यक्ष चाचणी करेल. त्यानंतरच त्यांची निवड करेल. तरी उमेदद्वाराने विहित तारखेपूर्वी आणि संवादकौशल्याची प्रत्यक्ष चाचणी करेल. त्यानंतरच त्यांची निवड करेल. तरी उमेदवाराने विहित तारखेपूर्वी JNU विद्यापीठाच्या www.jnu.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.