Raj Thackery On Nasrapur Caseत्याला हालहाल करत संपवा ! राज ठाकरे कडाडल, नसरापूर घटनेवर केला संताप व्यक्त (फोटो-सोशलमीडिया)

Raj Thackery On Nasrapur Case : राज्यात सर्वत्र एकाच दुर्दैवी घटनेची चर्चा सुरू आहे. नसरापुर येथे झालेल्या बालिकेच्या अत्याचार आणि खूनामुळे लोकांमध्ये खुप संताप व्यक्त होत आहे. आता मनसे नेते राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या नराधमाला हालहाल करत संपवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई : 05-05-2026 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर ( Raj Thackery On Nasrapur Case) येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकऱणाने महाराष्ट्र हादरला आहे. राज ठाकरेंनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. फास्टट्रॅक कारवाईच्या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, महाराष्ट्राती वाढत्या गुन्हेगारी आणि बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. कायद्याचा धाक उरला नसल्याचे सांगत, समाजाचे ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ भरकटल्याचे चे म्हणाले.

नसरापुर घटना ( Raj Thackery On Nasrapur Case)

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुर गावात अवघ्या साडेतीन-चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. 1 मे रोजी घडलेल्या या घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. राज्यात संतापाची लाट उसळली असून, हा अत्याचार कऱणाऱ्या आरोपीविरोधात तर लोक पेटून उठले आहेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, न्याय करा, त्या चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी जनतेकडून होत असून या घटनेमुळे लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेक राजकारण्यांनीदेखील याघटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे. ” या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोणी काय म्हणाले याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.”अशी थेट मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाऊंटवरून राज ठाकरे यांनी एक लांबलचक पोस्ट लिहून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू असे म्हणणाऱ्या सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी, असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मुली, स्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण कऱण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. राज्याचं ‘लक्ष’ विचलित झालंय आणि ‘लक्ष्य’ भरकटलयं अशा शब्दातं राज ठाकरे यांनी टिकास्र सोडलंय.

काय म्हणाले आहेत राज ठाकरे ? …( Raj Thackery On Nasrapur Case)

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने अक्षरशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणते याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.

सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. आणि असं नाहिये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे. तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन कऱणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्रियांचं, मुलींचं शोषण कऱणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी या पोस्टद्वारे विचारला आहे.

कोडगेपणा दिसून येतो ( Raj Thackery On Nasrapur Case)

या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच. पण अशा घटना वारंवरा का घटत आहेत ? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्री शिक्षणाचा, स्री सक्षमीकरणाचा पाया घातला, त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको ? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का ?

या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचे ‘लक्ष’  आणि ‘लक्ष्य’ विचलित झालं आहे… आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

तीच भीती आता नष्ट झाली आहे. ( Raj Thackery On Nasrapur Case)

‘सत्ता मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासुर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे. प्रत्येकाला या ना त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे गाजवायची आहे. राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. हल्ली लेखकांना पण साहित्या संमेलनाच्या मार्फत सल्ला गाजवायचा मोह होतो. अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सत्तेची लढाई पेटते, आणि एकूणच सत्तेच्यासाठी वाट्टेल ते यांचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरूषार्थ वाटतो. जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटतं. अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्यांच शोषण करतो.

याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं. कोणीतरी कोणाचेतरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांना धाक होता. समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी लक्ष असायचं तेच हललं आहे.

पूर्वी आपल्याकडे कोणीतरी बघतयं, उद्या काही केलं तर आपली, आपल्या घरच्यांची समाजात छीथू होईल ही भीती असायची तीच आता नष्ट झाली आहे. हे गंभीर आहे. समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तीवर समाजाती, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीसं झालेले दिसतयं, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, ओटीटी वरचा कन्टेट, पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणे आणि मोबाईल मधे सतत गूंतून राहणे याने सगळी घडी विस्कटलेली आहे.

तर मात्र आपला वाली कोणीच नाही ( Raj Thackery On Nasrapur Case)

या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अखिक जखमी होत आहे याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे. मी नेहमी माझ्या भाषणांत सांगतो की 1995 नंतर महाराष्ट्र आरापार बदलला. 1992 पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले. उदारीकरणाचे वारे देशभर धुमू लागले, परंतू हे वारे आपण निट समजूनच घेतले नाहीत. उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले पण जिथे आम्हाला लोकशाहीच समजली नाही तेथे उदारीकण काय समजणार ? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उद्धस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रीत आणि लालसाक्रेंदीत केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणी नाही हे नक्की.

मी, माझा याच समाजाचा घटक आहोत. ज्या ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी कऱण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्र विचलित झालेलं ‘लक्ष’ आणि भरकटलेले ‘लक्ष्य’ पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं ! अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!