HSC Result 2026बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली ! HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर ( फोटो- सोशलमीडिया)

HSC Result 2026 : वर्षभर भरपूर अभ्यास केल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असते ती निकालाची. आता त्यांची ही प्रतिक्षा संपली असून, HSC बोर्डाने निकालीची तारीख जाहीर केली आहे. या निकालाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

मुंबई : 30-04-2026 

मार्च महिन्यात परीक्षा संपल्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना (HSC Result 2026) प्रतिक्षा असते, ती निकालाची. बारावीच्या विद्यार्थ्यांची ही प्रतिक्षा संपली असून, HSC बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सर्वात आधी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल येत्या शनिवारी म्हणजे 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल कुठे पहायचे याची वेबसाईट जाहीर कऱण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) ची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा संपल्यानंतर आता सर्वत्र निकालाची उत्सुकता होती. बारावीच्या निकालाबद्दलची ही उत्सुकता आता संपली असून, निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा  (HSC Result 2026)

यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीच्या परीक्षांसाठी 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदाची दहावी आणि बारावीच्या निकालांकडे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे दरवर्षी प्रमाणे लक्ष लागून होते. मात्र आता 12 वीच्या विद्यार्थ्यांची ही प्रतिक्षा संपली आहे.

किती वाजता होणार निकाल जाहीर ? (HSC Result 2026)

येत्या शनिवारी 2 मेला निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 1 वाजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहेत.

mahahsscboard.in या संकेतस्थळावर बारावीचे निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

तसेच maharesult.nic.in,

hscresult.mkcl.org,

mahahsscboard.in

या सर्व वेबसाईटवरून तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. (HSC Result 2026)

10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात तर 12 वीची 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा पार पडली. दोन्ही परीक्षा संपून महिन्याभराच्या कालावधी नंतप परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

 निकाल कुठे पाहू शकता ?

https://mahrelsult.nic.in

https://hscresult.mkcl.org

https://hscresult.mahahsscboard.in

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!