Ahilyanagar Government Medical College : अहिल्यानगर ‘सिव्हिल’ रूग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू कऱण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
अहिल्यानगर : 28-04-2026
अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Ahilyanagar Government Medical College) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्ह्याच्या सामान्य रूग्णालय परिसरात अखेर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ याच शैक्षणिक वर्षापासून (2026) सुरू होत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची वर्षभरातच अंमलबजावणी करत महायुती सरकारने जिल्ह्याला मोठी आरोग्य भेट दिली आहे.
Table of Contents
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत (Ahilyanagar Government Medical College)
6 मे 2025 रोजी अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी म्हणजे चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत जिल्ह्यासाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले अशून, सोमवारी 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महाविद्यालय यंदापासूनच कार्यान्वित होत असल्याचे जाहीर केले.
शंभर जागा आणि अत्याधुनिक सुविधा (Ahilyanagar Government Medical College)
या नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.
काय असणार वैशिष्ट्ये (Ahilyanagar Government Medical College)
विद्यार्थी क्षमता दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची (MBBS) संधी मिळणार आहे.
रूग्णालय क्षमता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 430 खाटांची क्षमता असलेले सुसज्ज रूग्णालय या कॉलेजला जोडलेले असेल.
प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026 पासूनच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा घेणार गती (Ahilyanagar Government Medical College)
अहिल्यानगर जिल्हाय भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज होती. आता सिव्हिल हॉस्पिटलचे रुपांतर मेडिकल कॉलेजमध्ये झाल्यामुळे येथे तज्ञ डॉक्टकांची उपलब्धता वाढणार असून, जिल्ह्यातील सामान्य रूग्णांना उच्च दर्जाचे उपचार स्थानिक पातळीवर मोफत उपलब्ध होतील. राज्यातील महायुती सरकारने दिलेल्या शब्दाला जागत वर्षभरात हे महाविद्यालय सुरू केल्याने जिल्हाभरातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.