Mumbai Bullet Train Newsमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा सर्वात मोठा अडथळा दूर, समुद्रात 7 किलोमीटर खोल बोगदा करणार

Mumbai Bullet Train News : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता सुसाट धावणार आहे. 21 किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्यासाठी टनेल बोरिंग मशीन्स (टीबीेएम) बसण्याचे काम सुरू झाले आहे.

मुंबई : 10-04-2026 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामाला सुरूवात झाली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिलफाटा (सावळीजवळील घणसोली) पर्यंत 21 किलोमीटर लांबीचा भुयारी बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या 16 किलोमीटर भागासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीेएम) बसवण्याचे काम सुरू झाले आहे. पाण्याखाली बांधला जाणारा हा देशातील पहिला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा असेल. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पेरेशन लिमिटेड (एनएचएलआरसीएल) नुसार, बुलेट ट्रेनसाठीचा हा बोगदा ठाणे खाडीखालून जाईल. या उत्खननामध्ये निवासी भागांखाली खोदकाम करावे लागणार असल्याने, हा संपूर्ण विभाग प्रकल्पाचा सर्वात आव्हानात्मक भाग मानला जात आहे.

पूर्ण झालेले काम (Mumbai Bullet Train News)

आतापर्यंत या बोगद्याचा 5 किलोमीटरचा भाग स्फोटकांचा वापर करून पूर्ण झाला आहे. उर्वरित 16 किलोमीटरचे उत्खनन टीबीएमच्या सहाय्याने केले जाईल. हा 13.1 मीटर व्यासाचा एकद बोगदा असेल आणि त्यात दोन ट्रॅक असतील. बोगदा जमीनीच्या पातळीखाली 25 ते 57 मीटर खोल बांधला जाईल. सर्वात खोल बिंदू पारसिक टेकडीखाली 114 मीटरपर्यंत पोहोचेले.

सर्वात मोठा अडथळा पार केला (Mumbai Bullet Train News)

विक्रोळीमध्ये, टीबीएमच्या (TBM) मुख्य शील्डचा एक भाग 56 मीटर खोलीपर्यंत (अंदाजे 20 मजली इमारतीच्या आकाराएवढा) खाली उतरवण्यात आला आहे. या भागाचे वजन अंदाजे 170 टन  आहे. (अंदाजे 20 मजली इमारतीच्या आकाराएवढा) खाली उतरवण्यात या भागाचे वजन अंदाजे 170 टन आहे. जर्मनीमधून दोन टीबीएम मशीन्स आयात करण्यात आल्या आहेत. यापैकी TBM-1 चे वजन 3080 टन आणि TBM -2 चे वजन 3184 टन आहे. टीबीएम खाली उतरवण्यासाठी तीन शाफ्ट बांधण्यात आले आहेत. यामुळे सर्वात मोठा अडथळा पार झाला आहे.

शाफ्ट बांधले जाणार  (Mumbai Bullet Train News)

पहिला शाफ्ट बीकेसीमध्ये, दुसरा विक्रोळीमध्ये आणि तिसरा सावली (घणसोली ) येथे बांधला जात आहे. एक टीबीएम विक्रोळीकडून केबीसीच्या दिशेने, तर दुसरे सावलीकडून विक्रोळीच्या दिशेने खोदकाम करेल. दोन्ही मशीन्स भारतातील सर्वात प्रगत बोगदा खोदणारी मशीन्स आहेत. ते 95.32 मीटर लांब असून, मुंबईच्या कठीण माती आणि पाणथळ भूभागासाठी खास तयार केलेल्या मिश्र शील्ड आणि स्लरी तंत्रज्ञानाचा वापर करून चालवले जातील.

हे मशीन सात दिवसांत तयार होणार (Mumbai Bullet Train News)

एनएचएसआरसीएलच्या (NHSRCL) मते, टीबीएमला (TBM) पूर्णपणे एकत्र करून त्याची चाचणी घेण्यासाठी सात दिवस लागतील, त्यानंतर उत्खननाच्या कामाला सुरूवात होईल. मशीनच्या कटर हेडचा कमाल वेग 4 आरपीएम (RPM) असून ते प्रति मिनीट 49 मिलीमीटरच्या वेगाने उत्खनन करू शकते.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!