Asha Bhosle Passes Awayसंगीत विश्वावर शोककळा... सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन .

Asha Bhosle Passes Away : सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडसह संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

मुंबई : 12-04-2026 

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle Passes Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. शनिवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज (दि.12) त्यांची प्राणज्योत मालवली.

पार्श्वगायिका आशा भोसले यांना काल ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर आज त्यांची प्राण ज्योत मालवली आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज आशा ताईंच्या जाण्याने भारतातील प्रत्येकजण हळहळला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर उद्या (दु.13) शिवाजी पार्कवर अंत्यंसंस्कार होणार आहेत. दुपारी 4  नंतर त्यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहे. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

चिरतरूण आवाज हरपला (Asha Bhosle Passes Away)

आशा भोसले यांनी 1948 ला आशा भोसले यांनी चुनरिया चित्रपटाद्वारे पार्श्वगायक क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. त्यांनी 12 हजार हून अधिक गाणी गाण्याचा विक्रम नोंदवला आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताला वेगळ्या उंचीवर नेले. त्यंनी 7 दशकाहून अधिक काळ मराठी, हिंदीसह अनेक भाषांत हजारो गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना 2008 ला पद्मविभिषूण, 2000 यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या अष्टपैलू गायकीने सर्वांना कायमच मंत्रमुग्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *