Open Your Eyes FoundationOpen Your Eyes Foundation

Open Your Eyes Foundation : फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र प्रेम दिवस साजरा केला जातो. अशावेळी आपल्या समाजातील खास विशेष मुलांसाठीही शहरात प्रेम दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आखण्यात आले होते. ओवायई आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला होता.

पुणे : 16-02-2026

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, पण हे प्रेम केवळ गुलाबाच्या फुलांपुरते मर्यादित न ठेवता, ते सामाजिक बांधिलकीच्या रूपात साजरे करण्यात आले. ओपन युअर आईज (ओवायई)) फाउंडेशन (Open Your Eyes Foundation) आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३५ दिव्यांग मुलांना चक्क हेलिकॉप्टरची सफर घडवून आणण्यात आली. आकाशात झेपावताना या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद उमटला, त्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.

सहा मिनिटांचाअविस्मरणीयप्रवास  (Open Your Eyes Foundation )

नेहमी जमिनीवरून कुतूहलाने विमान किंवा हेलिकॉप्टर पाहणाऱ्या या मुलांसाठी हा अनुभव स्वप्नवत होता. डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने आणि महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते, कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्याने मुलांना ६ मिनिटांची राईड देण्यात आली. हेलिकॉप्टर जमिनीवरून अलगद वर जाताच मुलांनी टाळ्या वाजवून आणि हात हलवून आपला आनंद व्यक्त केला.

 “आम्ही आज खऱ्या अर्थाने उडालो! वरून सगळं काही छोटं आणि सुंदर दिसत होतं. आमचं स्वप्न पूर्ण झालं,” अशा शब्दांत एका मुलाने आपली भावना व्यक्त केली.

या उपक्रमाबाबत बोलताना ओवायई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सिमरन जेठवानी म्हणाल्या, “या मुलांना सहानुभूती नको, तर संधी आणि सन्मान हवा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून आमचा उद्देश सफल झाला. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर समाजाला दिलेलासमावेशकतेचासंदेश होता.”

महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते यांनी देखील या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “डॉ. जेठवानी यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या सामाजिक कार्यात सहभागी झालो. ३५ मुलांना हा आनंद देता आला याचा आम्हाला अभिमान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

आकाशातून दिसणारी मुळामुठा नदी, पुण्याचे रस्ते, छोटी दिसणारी झाडे आणि माणसे पाहून मुले भारावून गेली होती. झाडेगाड्या जणू खेळण्यासारख्या वाटत होत्या, अशी निरागस प्रतिक्रिया मुलांनी दिली. ‘व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला असून, दिव्यांगांच्या आयुष्यात नवी उमेद देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!