T20 World Cup Bangladesh Updateपाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशची माघार, नवीन वादाला फुटले तोंड

T20 World Cup Bangladesh Update : यावर्षीच्या टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याच्या निर्णयावरून बांगलादेशमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. परंतु आता बांगलादेशने आता विश्वचषकातून माघार घेण्याबाबत केले मोठे विधान ज्यामध्ये खेळाडूंना दोषी ठरवले आहे.

बांगलादेश : 11-02-2026 

सध्या सर्वत्र टी-20 वर्ल्डकपची चर्चा सुरू आहे. बांगलादेशच्या (T20 World Cup Bangladesh Update) माघारीचा मुद्दा सर्वत्र चर्चेचा झाला आहे. हा मुद्दा आता केवख खेळांपुरता मर्यादित राहिलेलेा नाही, तर राजकीय वक्तृत्वाचे रुप धारण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरूल यांनी एक विधान जाहीर केले आहे. ज्यामुळे संपूर्ण वादाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मंगळवार 10 फेब्रुवारीला त्यांनी सांगितले की, विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांनी घेतला आहे. त्यांच्या मते, हे पाऊल देशाचा सन्मान आणि क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन उचलले गेले आहे. सरकारने फक्त या निर्णयाचे समर्थन केले. या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

काय केले होते आधीचे वक्तव्य ? (T20 World Cup Bangladesh Update)

काही आठवड्यापूर्वी म्हणजेच 22 जानेवारी रोजी आसिफ नजरूल यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितले होते की, सरकारने विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी असेही म्हटले होते की, आयसीसीकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. त्यावेळी असे सूचित करण्यात आले होते की खेळाडूंना केवळ निर्णयाची माहिती देण्यात आली होती, त्यांचा सल्ला घेण्यात आला नव्हता. मात्र नवीन विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे. परंतु आसिफ म्हणते की, खेळाडू आणि बोर्डाने राष्ट्रीय प्रतिष्ठेचे आणि देशाच्या क्रिकेटचे रक्षण करण्यासाठी हे बलिदान दिेले आहे.

आता विधानात बदल का ? (T20 World Cup Bangladesh Update)

त्यांच्या नवीन विधानात आता असे म्हटले आहे की, खेळाडू आणि मंडळाने राष्ट्रीय सन्मान आणि क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय स्वतः घेतला आहे. त्यांनी हे राष्ट्रीय हितासाठी उचललेले पाऊल असल्याचे वर्णन केले. हा बदल संपूर्ण वादाचे मूळ बनला आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!