Ritu Tawade Mumbai Mayorमुंबई महापौरपदी भाजपच्या रितू तावडे, उपमहापौरपदी शिवसेनेचे राहुल शेवाळे विराजमान

Ritu Tawade Mumbai Mayor : मुंबईतील बीएमसी महापौरपदाच्या निवडीवर शेवटी एकदाचे शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाक़डून आपला उमेदवार जाहीर झाला आहे. जाणून घेऊयात याविषयीची माहिती.

मुंबई : 07-02-2026 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल  जाहीर होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ झाला. तरीही भाजपकडून महापौरपदासाठी कोणाचेच नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे जनसामान्यांसह सर्वांनाच याची उत्सूकता लागून राहीली होती. शेवटी भाजपकडून त्यांचा उमेदवार जाहीर झाला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदासाठी रितू तावडे  (Ritu Tawade Mumbai Mayor)  आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणुक लढवली होती. या निवडणुकित शिवसेना- भाजपला एकत्रित बहुमत मिळाले. म्हणून त्यांनी महापौरपदासाठी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. आता महापौरपदासाठी भाजपाच्या उमेदवाराला पद मिळाले आहे.

कोण आहेत रितू तावडे ? (Ritu Tawade Mumbai Mayor)

भारतीय जनता पार्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) साठी नवीन महापौर म्हणून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. रितू तावडे या बीजेपीच्या ज्येष्ठ  नगरसेविका आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका राजकारणात सक्रिय आहेत. रितू तावडे यांनी नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 132 (घाटकोपर परिसर) मधून विजय मिळवला. ही त्यांची सलग तिसरी निवडणुक होती. यापूर्वी त्या 2012 मध्ये वॉर्ड क्रमांक 127 मधून पहिल्यांदा निवडून आल्या.

2017 मध्ये त्या वॉर्ड क्रमांक 121 (घाटकोपर) मधून विजयी झाल्या. 2025-26 च्या निवडणुकीत पुन्हा त्या घाटकोपर वॉर्ड 132 मधून निवडून आल्या आहेत. भाजपाच्या त्या पहिल्या उमेदवार आहेत, ज्या मुंबई महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांचे शिक्षण एस.वाय बी.कॉम पर्यंत झाले आहे. बीएमसीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. याकाळात त्यांनी मुंबईच्या शाळांसंबंधी मुद्द्यांवर काम केले आहेत. शाळांची सुधारणा, तेथील सुविधा आणि शिक्षण गुणवत्ता वाढवणे ही त्यांच्या प्राधान्यक्रमातील बाब होती.

रितू तावडे या आपल्या मतदारांशी थेट संपर्कात असतात, अशी त्यांची खासियत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शाळा आणि आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची सक्रियता नेहमी दिसते. यामुळेच त्यांची जनमानसात चांगली पकड आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!