World Autism Awareness Day – (2 April )
World Autism Awareness Day

World Autism Awareness Day – (2 April )

जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस – ( 2 एप्रिल )

संपूर्ण जगभरात २ एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता दिवस  (World Autism Awareness Day ) म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात काही लोकं असे आहेत, जे त्यांच्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाजाशी, स्वतःशी समायोजन करताना झगडत असतात. मतिमंद, विकलांग, अंध व्यक्तींच्या अडचणी  समाजाला समजून येतात, त्यामुळे त्याविषयीची जाणीवतरी समाजाला असते. मात्र  स्वमग्नता किंवा ‘ऑटिझम’ हा असा मानसिक आजार आहे, ज्याच्याविषयी समाजात आजही फार माहिती नाही. माहितीपेक्षा समज-गैरसमजच जास्त आहेत. म्हणूनच जागतिक स्वमग्नता जागरूकता (World Autism Awareness Day )  दिवसाच्या निमित्ताने आपण त्याची माहिती करून घेऊ.

जागतिक स्वमग्नता दिवस (World Autism Awareness Day )  कधी आणि कोणी सुरू केला ?

जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन (World Autism Awareness Day )  हा दरवर्षी २ एप्रिल रोजी आंतराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. जो संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी मिळून ठरवलेला आहे. ऑटिस्टिक व्यक्तींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हा दिवस (World Autism Awareness Day ) लोकांना प्रोत्साहित करतो.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस नियुक्त करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर २००७ च्या परिषदेत ऑटिझम दिवस (World Autism Awareness Day )  साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आणि १८ डिसेंबर २००७ रोजी हा प्रस्ताव सर्व राष्ट्रांच्या सदस्यांकडून स्विकारण्यात आला.

कतारमधील संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधी मोजाबिंत नासेर अल-मिस्नेद यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सर्व सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दिला. विशेष म्हणजे हा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानाशिवाय मंजूर करण्यात आला. मुख्यतः मानवी हक्क सुधारण्यासाठी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. इतके या दिवसाचे आणि याच्या जागृतिचे महत्त्व अधोरेखित होते.

ऑटिझम जागरूकता दिन आणि ऑटिझम जागरूकता महिना –

ऑटिझम जागरूकता दिन (World Autism Awareness Day )  आणि ऑटिझम जागरूकता महिना या दोन्ही बाबत कधीकधी ऑटिझम हक्क समर्थकांमध्ये मतभेद दिसून येतात. कारण त्यांचे असे म्हणणे आहे की हे असे दोन वेगवेगळे दिन साजरे करण्याने, ऑटिस्टिक लोकांविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी गैरसमज निर्माण होतात. ऑटिस्टिक सेल्फ ॲडव्होकसी नेटवर्कसह काही गट ‘ऑटिझम ॲक्सेप्टन्स डे’ हा शब्द दोन्ही कार्यक्रमांसाठी प्रतिउत्सव म्हणून वापरण्याचा सल्ला देतात. कारण ते ऑटिझमबद्दल जागरूकता वाढवण्याएवजी ऑटिझमविरोधी पूर्वग्रहांवर मात करण्यास प्रोत्साहन देतात. ऑटिझम दिनाव्यतिरिक्त (World Autism Awareness Day ) ऑटिस्टिक प्राइड डे दरवर्षी १८ जून ला आयोजित केला जातो. या दिनामुळे ऑटिस्टिक लोकांविषयीचा अभिमान,महत्त्व आणि व्यापक समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

स्वमग्नता / ऑटिझम म्हणजे काय ?

ऑटिझम या  मनोस्थितीचे पूर्ण नाव ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ असे आहे. याला ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन असंही म्हणतात. याची तिव्रता व्यक्तिनुरूप बदलत असतात. ऑटिझम असणारी व्यक्ती त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देते, कसा संवाद साधते, कसे वागते यानुसार त्यात फरक पडत असतो. ऑटिझम हा एक प्रकारचा मनोविकार आहे.

ऑटिस्टिक असण म्हणजे कोणता आजार किंवा रोग असणं नाही. ऑटिझम असणाऱ्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा वेगळ्याप्रकारे काम करतो. त्याची लक्षणं सहज लक्षात येत नाहीत. ऑटिझम ही स्थिती आयुष्यभर रहाणारी आहे. ही वैद्यकीय परिस्थीती नसल्याने त्यावर कोणतेही ठोस उपचार नाही. मात्र ही स्थिती असणाऱ्या व्यक्तींना काही गोष्टींमध्ये मदतीची गरज असते. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे.

कोणी लावला ऑटिझम विकाराचा शोध ?

स्वमग्नता किंवा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला. ऑटिझम (World Autism Awareness Day )  हा एक विकासात्मक विकार आहे. ज्यामुळे सामान्य विकासावर सामाजिक आणि संप्रेषण कौशल्यांच्या संदर्भात परिणाम करतो आणि आयुष्याच्या पहिल्या तीन वर्षांत मुलांमध्ये त्याची लक्षणे दिसतात. ही एक मज्जासंस्थेशी निगडित समस्या आहे. ज्यामुळे वर्तनविषयक समस्या दिसून येतात.

ऑटिझम असण्याची काही लक्षणं –

ऑटिझम (World Autism Awareness Day )  असल्याची काही लक्षणं मुलांमध्ये दिसत असतात, ते कोणते असू शकतात हे आपण जाणून घेऊ –

लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणं –

  • ऑटिझम असणारी मुलं काही गोष्टी सतत करत रहातात, जसं की हाताचा, बोटांचा चाळा, शरीर हलवत रहाणं
  • ठराविक शब्दांचा पुन्हापुन्हा वापर करणं
  • हाक मारल्यावर प्रतिसाद न देणं
  • नजर न देता बोलंणं
  • त्यांच्याकडे बघून हसल्यावर न हसणं
  • कुठला वास, चव, आवाज न आवडल्यास एकदम अस्वस्थ होणं
  • इतर लहान मुलांसारखं न बोलणं

मोठ्या मुलांमध्ये दिसणारी लक्षणं –

  • इतर लोक काय करतात हे न समजणं
  • साचेबद्ध दैनंदिन आयुष्य आवडणं, त्यात झालेला बदल सहन न होणं
  • विशिष्ट वस्तू, गोष्टींवर अतिरिक्त प्रेम करणं
  • ४ काही वेळा शब्दशः अर्थ घेऊन कृती करणं
  • स्वतःहून मैत्री करणं जमत नाही
  • काही त्रास होत असेल तरी, सांगता येत नाही

पालकांची भूमिका महत्त्वाची –

ऑटिस्टिक (World Autism Awareness Day )  मुलांची ओळख पटणं सर्वात महत्त्वाचे असते. त्यासाठी मुलांच्या जन्मापासूनच पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनावर लक्ष देणे आवश्यक आहे. आपलं मुल हाक मारल्यावर कसं प्रतिसाद देते ते तपासून बघावे. घरात कोणी पाहूणे आले तर मुल कसं प्रतिसाद देते हेही बघितले पाहिजे. मुल जर भिंतीवर सतत डोकं आपटत असेल, स्वतःचे केस ओढत असेल, स्वतःला चावणे अशा क्रिया करतात, त्याकडेही लक्ष देणं आवश्यक असते. थोडक्यात पालकांना आपल्या बाळाच्या वर्तणूकीकडे लक्षपूर्वक बघितले पाहिजे.

ऑटिझम मुलांच्या मदतीसाठी –

ऑटिझमची लक्षणे असणाऱ्या मुलांसाठी काही थेरपी उपलब्ध आहेत. या मुलांच्या श्रवण प्रक्रियेत काही प्रॉब्लेम आहेत का हे तपासले जाते. त्यांच्या वर्तणूकीतील बदल हेरून त्यानुसार त्यांना मदत केली जाते. त्यांच्यावर थेरपी केल्या जातात.

जगभरातील अनेक बुद्धीमान व्यक्तिमत्वांना ऑटिझमची लक्षणे होती, त्यात अल्बर्ट आईनस्टाइन, आयझॅक न्युटन, बिल गेटस्, एलॉन मस्क, शास्रज्ञ चार्ल्स डार्विन, कवी एमिली डिक्सन्स आदी अनेक बुद्धीमान, प्रसिद्ध लोकं आहेत, ज्यांनी त्यांच्या या विकारावर मात करत आपल्या क्षेत्रात प्रगति करत जगामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. तेव्हा आपल्या आजूबाजूला जर स्वमग्नता (World Autism Awareness Day )  असणारे कोणी असेल त्यांना समजून घेऊयात, त्यांना प्रेमाचा, मैत्रीचा हात पुढे करूयात.

  • ज्योती भालेराव

Leave a Reply

Releated Posts

History of April Fool’s Day – (1 st April)

एप्रिल फुल डेचा इतिहास  – ( १ एप्रिल  ) जगात अशा अनेक प्रथा, परंपरा असतात की त्याच्यामागे काही…

ByByJyoti BhaleraoMar 31, 2025

World Theatre Day – (Started – 27 March 1962 )

जागतिक रंगभूमी दिन – (२७ मार्च १९६२) जगात जेव्हा चलचित्रांद्वारे मनोरंजनाच्या माध्यमाचा म्हणजे चित्रपटांचा शोध लागला नव्हता, तेव्हा…

ByByJyoti BhaleraoMar 26, 2025

World Tuberculosis Day 24th March – (Started – 24th March 1882)

जागतिक क्षयरोग (Tuberculosis) दिवस २४ मार्च – (सुरूवात – २४ मार्च १८८२  ) जगभरात असे काही आजार आहेत…

ByByJyoti BhaleraoMar 19, 2025

Saint Mahadamba – The first Saint poet in Marathi ( Born 1238 AD -Died 1308 AD)

संत महदंबा – मराठीतील पहिल्या संत कवीयत्री ( जन्म इ.स.१२३८- मृत्यू इ.स.१३०८ ) भारत हा देश आपल्या सांस्कृतिक…

ByByTanishqa DongareMar 11, 2025
2 Comments Text
  • temp mal says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Your blog is a treasure trove of knowledge! I’m constantly amazed by the depth of your insights and the clarity of your writing. Keep up the phenomenal work!
  • temparary mail says:

    Hey there You have done a fantastic job I will certainly digg it and personally recommend to my friends Im confident theyll be benefited from this site
  • Leave a Reply