Vidyanand Bapat Attackपुण्यात डिजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण, हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् !

Vidyanand Bapat Attack : पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर विद्येच्यामाहेर घरी, सांस्कृतिक राजधानी समजल्याजाणाऱ्या या शहरात हल्ला झाला आहे. गेल्या दिवसांपासून त्यांनी डिजे विरोधात दंड थोपटले आहे.

पुणे : 03-08-2o26

पुण्यातील विद्यानंद बापट यांना मारहाण (Vidyanand Bapat Attack) झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट यांची सध्या महाराष्ट्रासह देशभरात चर्चा सुरू आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावर्णप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे.

पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरूवारी मारहाण कऱण्यात आली आहे. विद्यानंद बापट यांनी घेचलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डिजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते.

विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळाचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण कऱण्यात आली आहे.

हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले ? (Vidyanand Bapat Attack)

तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्र नव्हतो. पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्वर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् … चिप प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याते व्हिडिओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा, म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल.

त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तीवाद कऱणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करू शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला.

कोण आहेत विद्यानंद बापट ? (Vidyanand Bapat Attack)

विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट हे 37 वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करताता. ते मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!