Table of Contents
क्रोएशियाचा वाद्यमय समुद्रकिनारा, सी ऑर्गन, झडार ( भेटीचे वर्ष 2025 )
तुम्ही कोणत्याही देशाचे रहिवासी असाल, पण तुम्हाला समुद्र आणि समुद्र किनारा आवडत नाही असे सहसा शक्य नाही. पण मी तुम्हाला अशा एका समुद्र किनाऱ्याची (Sea Organ Croatia Beach) आज ओळख करून देते, जेथे चोवीस तास, बारा महिने येथील समुद्री लाटांद्वांरे बासरी सारखे सुंदर सुर निर्माण होतात. निसर्ग आणि मानव या दोघांच्या कामगिरीतून येथे हे शक्य झाले आहे. तुम्ही याची माहिती घेतल्यावर अशा समुद्र किनारी जाऊन, तिथे शांत वेळ घालवण्याचे स्वप्न नक्की पाहू शकता. आज आपण मिसलेनियस भारतच्या, ‘मिसलेनियस वर्ल्डच्या’ या भागात जगातील एका अनोख्या समुद्र किनाऱ्याची माहिती घेऊ.
झदर येथील हा समुद्र किनारा आहे खास (Sea Organ Croatia Beach)
क्रोएशिया या देशातील ‘झदर’ हे एक असे ठिकाण आहे, जेथे एका विशाल समुद्र किनाऱ्यावर एक वास्तुशिल्प (Sea Organ Croatia Beach) बनवण्यात आले आहे. हे खरं तर एक ध्वनी निर्माण करणारे असे वास्तुशिल्प आहे. या समुद्र किनाऱ्यावर एका विशालकाय संगमरवरी पायऱ्यांच्या खालून निर्माण करण्यात आलेल्या विशिष्ट दगडी गोलाकार आणि चौकोनी खिडक्यांच्या जागेमधून एक सुंदर ध्वनी नौसर्गिकपणे सतत ऐकु येत रहातो. समुद्राच्या लाटा आणि या दगडी नळ्यांद्वारे हा ध्वनी निर्माण होत रहातो. हे या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
काय आहे या संगीत निर्माण करणाऱ्या समुद्र किनाऱ्याचा इतिहास (Sea Organ Croatia Beach)
युरोप खंडात असा क्वचित एखादा देश असेल, ज्याला दुसऱ्या महायुद्धाची झळ बसली नाही. याला क्रोएशिया हा देशही अपवाद नाही. दुसऱ्या महायुद्धात ‘ झदर ‘ येथेही मोठा विध्वंस झाला. युद्ध समाप्ती नंतर येथे अनेक ठिकाणी दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आली. सर्वत्र झालेल्या विनाशाची पुन्हा एकदा बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. युद्धा नंतर करण्यात आलेल्या पुर्नबांधणीमध्ये अनेक ठिकाणचे समुद्र किनारे भकास, निरस आणि कॉंक्रिटीकरणाच्या बांधकामात हरवून गेल्या सारखे झाले होते.
अशा सर्व निरस वातावरणात झदर शहराच्या किनाऱ्याची पुनर्चना करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून हा संगीत निर्माण करणारा ‘फ्लुट’ ऑर्गन समुद्र किनारा निर्माण करण्यात आला होता. भगवान श्री कृष्णांच्या बासरीची येते आठवण
भारतीयांनाच नाही तर पाश्चात्यांनाही भगवान श्रीकृष्णाची ओळख आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या हातातील बासरी हे वाद्य लोकप्रीय आहेच. बासरी या वाद्याची जशी रचना असते, तीच रचना आपल्याला या सी ऑर्गन समुद्र किनाऱ्यावरच्या या वास्तूशिल्पात आढळून येते. जगभरात अनेक सुमद्र किनारे आहेत. मात्र येथे सुरांच्या निर्मितीसाठी दगडाच कोरलेल्या रचना खरोखर अफलातून म्हणता येतील. समुद्राच्या किनारी उंच दगजडी कठडे निर्माण करण्यात आले आहेत. आत पाण्यापर्यंत संगमरवरी दगडू पायऱ्या निर्माण केलेल्या आहेत.
किनाऱ्याच्या वरच्या बाजूला दगडी ओट्यावर खोलगट गोल कोरण्यात आलेले आहेत. आणि पायऱ्यांच्या आत चौकोनी आकार कोरलेले आहेत. हे पहाताच आपण नकळत भारतीय वाद्य असणाऱ्या बासरीच्या रचनेशी त्याची तुलना करतो. बासरीतून ज्या तंत्रज्ञानानुसार सुरांची निर्मीती होते. तोच प्रकार येथे होते. बासरी वाजवताना आपण त्या गोल छिद्रांमध्ये फुंकर घालून सुरांची निर्मिती होते. येथे समुद्राच्या लाटांमुळे आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या दगडी छिद्रांमधून नैसर्गिकरित्या सुरांची निर्मिती होते. म्हणूनच हा मानव आणि निसर्ग या दोघांचा चमत्कार वाटतो. या गोलाकार छिद्रांना कान देऊन तुम्ही जर हे सुर एकले तर एक सुंदर अनुभुती मिळते. येथे फिरताना सतत हे सुर तुमच्या कानांवर रूंजी घालतात.
कोण आहे या समुद्र किनाऱ्याचा निर्माणकर्ता ? (Sea Organ Croatia Beach )
झरद शहराची आणि येथे असणाऱ्या समुद्र किनाऱ्याची पुनर्बांधणी कऱण्याच्या हेतूने वास्तुविशारद निकोला बाशिच यांनी हे वास्तूशिल्प (Sea Organ Croatia Beach) निर्माण केले. हे समुद्र किनाऱ्यावरचे वास्तूशिल्प 15 एप्रिल 2005 ला जनतेसाठी खुले करण्यात आले होते.
त्यांनी निर्माण केलेल्या या वास्तुशिल्पामध्ये त्यांनी एक प्रकारे दगडात वेगवेगळे आकार निर्माण केले आहेत. जसे की हे आकार म्हणजे या समुद्रकिनाऱ्याचे अवयव (Organ ) आहेत. आणि या दगडी आकार म्हणजेत अवयवातून सतत समुद्राच्या लाटांमुळे सुरेल ध्वनी निर्मिती होत रहाते. म्हणूनच या समुद्र किनाऱ्याला ORGAN SEA असेही म्हणतात. हा समुद्र किनारा पर्यटकांमध्ये खुपच लोकप्रिय आहे.
येथे बांधण्यात आलेल्या संगमरवरी पायऱ्या या पाण्याच्या आतपर्यंत बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांखाली पॉलिथिलीन ट्युबची एक प्रणाली आणि एक प्रतिध्वनी पोकळी निर्माण करण्यात आलेली आहे. या प्रणालीमुळे येथे संरक्षण आमि ध्वनी निर्मिती असे दोन्ही हेतू साध्य होतात. 2006 मध्ये सी ऑर्गनला युरोपनियन प्राईज फॉर अर्बन पब्लिक स्पेसच्या चौथ्या आवृत्तीचे एक्स-एक्वो बक्षीस देण्यात आले आहे.
निकोला बाशिच यांच्याविषयी (Sea Organ Croatia Beach)
झदरमध्येच हे काम आहे. ‘ग्रीटिंग टु द सन’ असे याचे नाव आहे. या कामाविषयीची माहिती आपण मिसलेनियस वर्ल्डच्या पुढील भागात घेणारच आहोत. याशिवाय त्यांनी 2010 मध्ये आणखी एक महत्त्वातचे काम केले. 2007 मध्ये वणव्याशी सामना करताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांचे स्मारक तयार केले. हे काम ‘द फिल्ड ऑफ क्रॉसेस ‘ या नावाने ओळखले जाते.
क्रोएशिया या देशाविषयी
निकोला बाशिच (जन्म 1946) हे क्रोएशियन वास्तुविशारद आहेत. झदारमधील सी ऑर्गनचे (Sea Organ Croatia Beach) निर्माणकर्ते हीच त्यांची जगभर ओळख आहे. त्यांचा जन्म म्युटर बेटावर झाला. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण झदारमधील शाळेमध्ये झाले. साराजेव्होमध्ये त्यांनी आर्किटेक्चर आणि अर्बनिझम फॅकल्टीमधून पदवी प्राप्त केली. बाशिच यांनी सी ऑर्गन या वास्तूशिल्पाशिवाय आणखी एक सुंदर गोष्ट निर्माण केलेली आहे.
क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागातील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी आहे. पूर्वी क्रोएशिया हा युगोस्लाव्हिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर 15 जानेवारी 1992 रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली. या देशाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीन संस्कृतींनी प्रभावित असल्याचे सांगितले जाते. आज आपण जो क्रोएशिया देश म्हणून ओळखतो, येथे सातव्या शतकात क्रोटस याचा उदय झाला. त्यांनी येथे विविध राज्यांना संघटीत केेले.
त्यानंतर तामिस्लाव प्रथम याचा 925 ई. मध्ये राज्याभिषेक केला आणि क्रोएशिया राज्य निर्माण झाले. क्रोएशिया म्हणून स्वतंत्र राज्याची स्वायत्तत्ता जवळजवळ दोन शतकं आबाधित होती. राजा पिटर क्रेशमिर चतुर्थ आणि जोनीमिर यांच्या शासन काळात क्रोएशियाचे साम्राज्य खुप समृद्ध होते. मात्र 1102 या काळात पेक्टा कराराच्या मध्यमातून क्रोएशियाच्या राजाने हंगेरीच्या राजाशी काही विविदास्पद समझौता करार केला. पुढे 1526 मध्ये क्रोएशियन संसदेने फ्रेडिनेंड याला हाऊस ऑफ हाब्सबर्ग येथून सिंहासनावर बसवले.
1918 मध्ये क्रोएशियाने ऑस्ट्रिया हंगेरी मधून वेगळे होण्याची घोषणा केली. आणि यूगोस्लाविया राज्यात सहसंस्थापक राज्य म्हणून सहभागी झाले. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींनी क्रोएशियाव कब्जा केला आणि क्रोएशिया हे स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन केले. मात्र पुढे महायुद्ध समाप्तीनंतर परत एकदा क्रोएशिया सहसंस्थापक म्हणून युगोस्लावियात विलिन झाले. 25 जून 1991 मध्ये क्रोएशिया ने आपण स्वतंत्र देश आहोत अशी घोषणा केली. तेव्हा पासून अत्ता आपण पहात असलेला क्रोएशिया हा स्वतंत्र अस्तित्व असणारा देश आहे.
किनाऱ्यावरील संगीत निर्मिती आणि पर्यटक (Sea Organ Croatia Beach)
क्रोएशिया म्हटलं की सुंदर सुंदर समुद्र किनारे, बेटं हेच डोळ्यासमोर येतं. मात्र तरीही या सी ऑर्गन चा हा एक छोटा भाग पर्यंटकांना जास्त भुरळ घालणारा आहे. भारतीयांना प्रिय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरीच्या सुरांची आठवण करून देणारा असा हा समुद्र किनारा आहे. इतके सुंदर, सुरेल संगीत येथे आपल्याला अुनभवायला मिळते.
माझ्या मते तुम्ही येथे दिवसापेक्षा रात्री शांततेत येथे भेट द्या. तरच तुम्हाला येथील लाटांनी निर्माण केलेले धीरगंभीर आवाजातील सुरेल सुर एकू येतील, दिवसाच्या पर्यंटकांच्या गोंगाटत ते तितकेसे निट एकू येण्याची शक्यता कमी आहे. रात्रीच्या निरव शांततेत, चंद्राच्या प्रकाशात या सुरांचा आस्वाद घेत येथे रेंगाळत बसायला मिळणं हे स्वर्गसुख म्हणता येईल. तेव्हा या संगीतमय समुद्राला तुम्ही नक्की भेट देण्याचं प्लॅनिंग करा. तुमच्या युरोप पर्यटनाच्या यादीत या ठिकाणाला नक्की स्थान द्या.कायम आठवणीत रहाणारे असे हे ठिकाण आहे.
खरेदीसाठी जवळचे स्पॉट –
या समुद्र किनाऱ्याच्या मागेच जवळच मोठे सुंदर जुने मार्केट आहे. भव्यदिव्य अनेक वास्तूंना बघत तुम्ही हे मार्केट फिरू शकता. खरेदी शिवायही येथे फक्त मार्केट बघण्याचा आनंदसुद्धा तुम्ही घेऊ शकता. इतर अनेक युरोपिय देशांप्रमाणे येथे म्हणावी तितकी महागाई नाही. तुम्ही या देशाची संस्कृती दर्शवणाऱ्या अनेक गोष्टी येथे खरेदी करून शकता. हे मार्केट फिरणे आणि येथील संस्कृती जाणून घेणे या दोन्ही गोष्टी तुम्ही याठिकाणी करू शकता. शांत, सुंदर आणि एक अध्यात्मिक अनुभव देणारा असा हा सी ऑर्गन अर्थात संगीतमय समुद्रकिनारा आहे. निसर्गाशी मैत्री करत आपली कलाकारी दाखवली तर किती सुंदर निर्मती होऊ शकते, हेच येथे आल्यावर समजते.
Leave a Reply