Pune City Transformation Committeपुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन, शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यास लागणार हातभार.

Pune City Transformation Committe : पुणे शहरातील 12 मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसनबाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आहे.

पुणे : 14-04-2026 

पुणे महापालिकेत समाविष्ट 32 गावांतील प्रत्येकी एक अशा 32 रस्त्यांचे काम महापालिका प्रधान्याने करणार आहे. यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवली जाणार आहे. शहरासमोरील वाढती विविध स्वरूपाची शहरी आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी तसेच विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणमांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी ‘शहर परिवर्तन समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

पुणे शहरातील रस्ते. पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुरळीत करणे अशा विविध प्रश्नांचा यात समावेश आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय विभागांमधील समन्वय वाढविणे, रस्ते चांगले करणे, शहर स्वच्छ आणि सुंदर कऱणे यावर उपाययोजनेबाबत शहर परिवर्तन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याची दुसरी बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली.

पुणे शहरामधील 12 मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसनबाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली असून, यामध्ये बाणेक-पाषाण लिंक रोड, वाकड़ ते कस्पटे वस्ती रोड. आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज रस्ता व वारजे येथील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर येथील मिसिंग लिंकवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यामधील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणाऱ्या बाबींवर चर्चा झाली.

महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आर.पी. रस्त्यानुसार प्रत्येक गावनिहाय एक रस्ता याप्रमाणे 32 गावांमधील पोलीस विभागांच्या समन्वयाने निश्चितीनुसार 32 प्रमुख रस्त्याच्या विकसनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तानी बैठकीमध्ये दिल्या आहेत. सदर रस्त्यांमधील जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांचे मंजूरीसाठी सादर कऱण्याबाबत सूचित केले व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्त्यांसाठी ताब्यात आलेल्या जागांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

6 मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार  (Pune City Transformation Committe)

नागरिकांचे सोयीसाठी पुणे महापालिकेमार्फत 6 मोबाईल ॲपलिकेशन्स तयार कऱण्यात आले आहेत. नागरिकांनी त्यांचे रस्ते संबंधित तक्रारीसाठी सदर ॲप्लिकेशन्सचा वापर करून तक्रार निवारण करण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच पोलीस विभागामार्फत तयार कऱण्यात आलेले पीटिपी(पुणे सिटी ट्रॅफिक पोलिस ) हे ॲप्लिकेशन्स पुणे महानगरपालिकेच्या 6 मोबाईल ॲप्लिकेशन्सला लिंक झाल्यास एकत्रितपणे रस्ते व वाहतूक सुरळीत होणार याबाबत चर्चा झाली.

पावसाळ्यामुले वॉटर लॉगिंगचे ठिकाणे निश्चित (Pune City Transformation Committe)

पोलिस उपायुक्त वाहतूक यांनी रस्ते खोदाईबाबत ना हरकत (एनओसी) तात्काळ देण्यात येईल, असे सूचित करून परिपूर्ण माहिती असणारे अधिकारी यांनी त्यासाठी संपर्क केल्यास निर्णय घेणे सोयीचे होईल, असे सूचित केले. पुणे मनपामार्फत विविध रस्त्यांवर पावसाळ्यामुळे वॉटर लॉगिंगचे ठिकाणे निश्चित कऱण्यात आले असून, त्यानुसार प्रत्येक परिमंडळ निहाय वॉटर लॉगिंग एरियासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून काम करून सुरू कऱणे येत आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!