A Journey Of Culture , History & Heritage

“हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै जाहला”  असे संत कवी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. या ओळींचा अर्थ असा की, संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि या संपूर्ण विश्वाला मी घरासारखे समजतो. सर्व विश्व माझे कुटुंब आहे. ‘मिसलेनियस भारत’ चा पर्यटना विषयीचा आमचा विचार ही असाच आहे. याच भावनेतून आम्ही जगभरातील पर्यटन, तेथील वैशिष्ट्य, जीवनमान यांचा पर्यटनाच्या माध्यमातून अभ्यास करून, तेथिल छायाचित्र घेऊन  ते आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते, स्वतःचा वेगळा इतिहास असतो, त्यानुसार तेथिल वारसास्थळं, जीवनमान आज वर्तमानात आपल्याला पहायला मिळतात. आज तो देश कसा आहे, पुर्वी त्यांचा इतिहास काय होता, तेथिल वारसास्थळांची वैशिष्ट्ये, विविध वारसास्थळांच्या निर्मितीच्या, त्यांच्या निर्माणकर्त्यांच्या कथा असा सगळा माहितीचा स्रोत घेऊन आम्ही मिसलेनियस भारतचा हा पर्यटनाचा प्रवास करत असतो. खरं तर हे जग फार विस्तीर्ण आणि विशाल आहे. सर्व देश विविधतेने नटलेले आहेत. प्रत्येक देशात, तेथिल शहरांत, ग्रामीण भागांत काहीना काहीतरी ऐतिहासिक वारसास्थळांचा ठेवा असतोच. प्रत्येक देशाची पौराणिक धार्मिक स्थळं, संग्रहालयं, उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळं असतात. ही पर्यटन स्थळं हीच त्या त्या देशातील शहरांची ओळख असतात. आज जगभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत, ज्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात धुसर होत आहे, मात्र त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व मोठे असते. अशाच  परिचित, अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडत आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून. या ब्लॉगमध्ये संपूर्ण जगभरातील पर्यटन आणि जीवनमानाची माहिती असणार आहे. हा प्रवास माझ्यासारख्या  एका भारतीय प्रवाशाच्या लेखणीतून आणि कॅमेरातून उलगडलेला आहे. मिसलेनियस भारतच्या या जागतिक प्रवासातून वाचकांना कायम नवनविन माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मिसलेनियस भारतचा हा माहितीरूपी खजिना तुम्हाला नक्कीच आनंद देत राहिल.

Popular Posts:

Tuberculosis
Miscellaneous Articles
Jyoti Bhalerao

World Tuberculosis Day 24th March – (Started – 24th March 1882)

जागतिक क्षयरोग (Tuberculosis) दिवस २४ मार्च – (सुरूवात – २४ मार्च १८८२  ) जगभरात असे काही आजार आहेत ज्यांच्याविषयी समाजात अनेक समज-गैरसमज असतात. अशा काही

Read More »
Chaplins world
Miscellaneous World
Jyoti Bhalerao

Chaplins world in Switzerland ( 2016 )

 चॅप्लिन्स् वर्ल्ड , स्वित्झर्लंड – ( निर्मिती २०१६ ) आपल्या मूकचित्रपट आणि विनोदी अभिनयाने  संपूर्ण जगावर गारूड करणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे चार्ली चॅप्लिन. या जगप्रसिद्ध

Read More »
Saint Mahadamba
Indian Culture
Tanishqa Dongare

Saint Mahadamba – The first Saint poet in Marathi ( Born 1238 AD -Died 1308 AD)

संत महदंबा – मराठीतील पहिल्या संत कवीयत्री ( जन्म इ.स.१२३८- मृत्यू इ.स.१३०८ ) भारत हा देश आपल्या सांस्कृतिक परंपरा, कला आणि वैविध्यापूर्ण जीवनशैलीसाठी ओळखला जातो.

Read More »
women's day
Miscellaneous Articles
Jyoti Bhalerao

International Women’s Day – March 8

आंतरराष्ट्रीय महिला दिवस – 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस (Women’s Day) हा दरवर्षी जगभरात 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. महिलांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी

Read More »
Marathi Bhasha Gaurav Din
Miscellaneous Articles
Jyoti Bhalerao

Marathi Bhasha Gaurav Din : Since 2013

मराठी भाषा गौरव दिन : २०१३ लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. अशा भावना व्यक्त करणारे मराठी भाषिक, अर्थात महाराष्ट्राचे नागरिक. मराठी भाषा खुप समृद्ध आहे,

Read More »
World Pulses Day
Miscellaneous Articles
Jyoti Bhalerao

World Pulses Day – Since 10 February 2016 !

प्रत्येक देशाची ओळख ही त्या देशाची भाषा आणि खाद्यसंस्कृती यातून जगाला होत असते. जगात शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यसंस्कृती बघायला मिळते. त्यातील शाकाहारींना प्रथिनांचे महत्त्व समजावे,

Read More »

Join our newsletter to stay updated

Miscellaneous World :

Heritages

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!