
International Women’s Day – March 8
आंतरराष्ट्रीय महिला दिवस – 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस (Women’s Day) हा दरवर्षी जगभरात 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. महिलांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी
“हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै जाहला” असे संत कवी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. या ओळींचा अर्थ असा की, संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि या संपूर्ण विश्वाला मी घरासारखे समजतो. सर्व विश्व माझे कुटुंब आहे. ‘मिसलेनियस भारत’ चा पर्यटना विषयीचा आमचा विचार ही असाच आहे. याच भावनेतून आम्ही जगभरातील पर्यटन, तेथील वैशिष्ट्य, जीवनमान यांचा पर्यटनाच्या माध्यमातून अभ्यास करून, तेथिल छायाचित्र घेऊन ते आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते, स्वतःचा वेगळा इतिहास असतो, त्यानुसार तेथिल वारसास्थळं, जीवनमान आज वर्तमानात आपल्याला पहायला मिळतात. आज तो देश कसा आहे, पुर्वी त्यांचा इतिहास काय होता, तेथिल वारसास्थळांची वैशिष्ट्ये, विविध वारसास्थळांच्या निर्मितीच्या, त्यांच्या निर्माणकर्त्यांच्या कथा असा सगळा माहितीचा स्रोत घेऊन आम्ही मिसलेनियस भारतचा हा पर्यटनाचा प्रवास करत असतो. खरं तर हे जग फार विस्तीर्ण आणि विशाल आहे. सर्व देश विविधतेने नटलेले आहेत. प्रत्येक देशात, तेथिल शहरांत, ग्रामीण भागांत काहीना काहीतरी ऐतिहासिक वारसास्थळांचा ठेवा असतोच. प्रत्येक देशाची पौराणिक धार्मिक स्थळं, संग्रहालयं, उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळं असतात. ही पर्यटन स्थळं हीच त्या त्या देशातील शहरांची ओळख असतात. आज जगभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत, ज्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात धुसर होत आहे, मात्र त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व मोठे असते. अशाच परिचित, अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडत आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून. या ब्लॉगमध्ये संपूर्ण जगभरातील पर्यटन आणि जीवनमानाची माहिती असणार आहे. हा प्रवास माझ्यासारख्या एका भारतीय प्रवाशाच्या लेखणीतून आणि कॅमेरातून उलगडलेला आहे. मिसलेनियस भारतच्या या जागतिक प्रवासातून वाचकांना कायम नवनविन माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मिसलेनियस भारतचा हा माहितीरूपी खजिना तुम्हाला नक्कीच आनंद देत राहिल.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस – 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस (Women’s Day) हा दरवर्षी जगभरात 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. महिलांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी
मराठी भाषा गौरव दिन : २०१३ लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. अशा भावना व्यक्त करणारे मराठी भाषिक, अर्थात महाराष्ट्राचे नागरिक. मराठी भाषा खुप समृद्ध आहे,
प्रत्येक देशाची ओळख ही त्या देशाची भाषा आणि खाद्यसंस्कृती यातून जगाला होत असते. जगात शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यसंस्कृती बघायला मिळते. त्यातील शाकाहारींना प्रथिनांचे महत्त्व समजावे,
भारतीय सैनिकांच्या साहस आणि त्यागाच्या गौरवाचा दिवस म्हणजे भारतीय सैन्य दिन – (सुरूवात १५ जानेवारी १९५० ) आपला भारत देश आज सुरक्षित आणि भक्कमपणे उभा
विश्व मान्यतेसाठी साजरा केला जाणारा ‘विश्व हिंदी दिन’ -२०२५ – (सुरूवात- १० जानेवारी २००६) भारतासारख्या विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या देशात सर्वात जास्त भाषा बोलली जाते
कोणत्याही देशाची ओळख ही त्या देशाची संस्कृती, इतिहास, समाज म्हणजेत येथील नागरिक यावरूनच होत असते. देशातील हे नागरिक जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन विविध क्षेत्रात आपली