Municipal Election Result 2026मुंबईत कमळाला जनतेची साथ ! बीएमसीवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर

Municipal Election Result 2026 : भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला असून मुंबईकरांनी विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचे म्हटले आहे.

मुंबई : 16-01-2026 

मंबई महानगरपालिकेच्या (BMC) इतिहासात आज पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार आहे. आत्तापर्यंतच्या निकालावरून (Municipal Election Result 2026) तसे निश्चित झाले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. मुंबईकरांनी विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचे म्हटले आहे.

फडणवीसांचा अमित साटम यांना फोन (Municipal Election Result 2026)

विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फोन करून त्यांचे विशेष अभिनंदर केले. ” अमित, तुमचे मनापासून अभिनंदन ! तुम्ही खूप चांगले काम केले आहे, हे यश जबरदस्त आहे. आता कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही”. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी साटम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर ! (Municipal Election Result 2026)

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बीएमसीवर आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, यावर्षी भाजपने बाजी मारली आहे. हे वर्चस्व मोडीत काढत, यंदा भाजपाचा महापौर बसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत, त्यांनी सांगितले की, “मेट्रे, कोस्टल रोड आणि ट्रान्स-हार्बर लिंक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या कामावर मुंबईकरांनी विश्वास टाकला आहे. “

राहुल नार्वेकरांकडून मुंबईकरांचे आभार

विधानसभा अध्यक्ष्य राहुल नार्वेकर यांनीही या विजयाचे स्वागत केले. ” हा जनादेश मुंबईच्या बदलत्या रुपासाठी दिला गेला आहे. कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य केले आहे, त्याचाच हा परिणान आहे ” असे नार्वेकर म्हणाले.

विजयोत्सवासाठी फडणवीस नागपूरात

विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी 7 वाजता नागपुरात पोहोचणार आहेत. तिथे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विजय साजरा करणार आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!