Mrs. Deshpande crime Thriller : माधुरी दिक्षितचे नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगमन झाले आहे. नुकतीच तीची ‘मिसेस देशपांडे’ नावाची क्राईम थ्रिलर वेबसीरीज प्रसिद्ध झाली आहे. जाणून घेऊ याविषयी.
मुंबई : 22/12/2025
माधुरी दीक्षित म्हटलं की, सर्वात समोर येतं ते तीच्या नृत्य अदा आणि रोमांटिक अंदाज. मात्र यावेळी माधुरी दिक्षित घेऊन आली (Mrs. Deshpande crime Thriller) आहे, संपूर्ण वेगळे कथानक असणारी वेबसिरीज. ‘मिसेस देशपांडे’ नावाची क्राईम वेबसिरीज सध्या हॉट स्टारवर रिलिज झाली आहे. सिरिज विषयी वेगवेगळी मते ऐकायला मिळत आहे. आम्ही घेऊन आलो आहोत, याविषयीचा खास रिव्ह्यु.
सहा भागांची ही सस्पेन्स थ्रिलर सीरिज आपले नक्कीच मनोरंजन करते. तुम्हाला जर सस्पेन्स, क्राईम स्टोरी आवडत असतील आणि त्यात तुम्ही माधुरी दिक्षितचे फॅन असाल तर, तुम्ही ही वेबरसिरीज नक्की बघा.
Table of Contents
सर्व काही ‘माधुरी दिक्षित ‘ ( Mrs. Deshpande crime Thriller)
माधुरी दिक्षित ओळखली जाते ते तिच्या फेशियल एक्सप्रेशन साठी. यावेळीही त्याच अदाकारीने तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. एका गुढ, क्रूर हास्याने तिने ही संपूर्ण वेबसिरिज व्यापून टाकली आहे. एक साधी खानावळ चालवणारी सामान्य बाई, पुढे जाऊन आठ जणांचे खून करते. तेही अत्यंत क्रूरपणे. ते खून ती का करते ? कसे करते ? 25 वर्षांनंतर त्याच संदर्भाने पुन्हा असेच खून सत्र का सुरू होतात ? आणि त्याचा संदर्भ या आठ खून केलेल्या मिसेस देशपांडेशी काय असतो ? या सर्वांची उत्तर मिळवण्यासाठी ही सिरिज नक्की बघा. काही प्रसंगात दाखवण्यात आलेलं जुनं पुणं, माधुरी दिक्षितचे गुढ हास्य, एकेकाळी ‘तुम बीन’ या चित्रपटाच्या माध्यमातून लाखो मुलींच्या दिलोंकी धडकन बनलेल्या ‘प्रियांशु’चा पोलीस ऑफिसर, केविन दवे चा ‘होश’ आणि आपले मराठमोठे सिद्धार्थ चांदेकर आणि प्रदीप वेलणकर यांच्या दमदार अभिनयाने रंगलेली ही वेबसिरीज आहे.
नागेश कुकन्नुर चे दिग्दर्शन (Mrs. Deshpande crime Thriller)
नागेश कुकनुर च्या दिग्दर्शनाखाली ही क्राईम थ्रिलर चांगली जमून आली आहे. काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत, की पुढच्या भागात त्या सांगण्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत हे काही ठिकाणी समजत नाही. मात्र माधुरी दिक्षितच्या वेगळ्या कथानकातील अभिनयासाठी एकदातरी नक्की बघावी.
वेगळी कथा (Mrs. Deshpande crime Thriller)
एकेकाळी पुण्यात आठ खूनांच्या घटना घडून गेलेल्या आहेत. त्या सर्व खूनांची मास्टर माईंड एका सामान्य घरातील बाई ‘मिसेस देशपांडे’ ही असते. 25 वर्षांचा काळ तिने यासाठी जेलमध्ये घालवला आहे. मात्र पुन्हा एकदा तिच्यात पद्धतीचे खून ‘मुंबई’त सुरू होतात. तेव्हा मिसेस देशपांडे हैद्राबादच्या जेलमध्ये असते. मग हे खून कोण करत आहे ? असा प्रश्न पोलिसांना पडतो. या सिरियल किलरला पकडण्यासाठी जुन्या सिरियल किलर म्हणजे मिसेस देशपांडेची मदत घेण्याचे ठरवले जाते. आणि सुरू होतो तपास आणि थरार.
सिद्धार्थ चांदेकरचा लक्षवेधी पोलिस ऑफिसर ( Mrs. Deshpande crime Thriller )
आजपर्यंत सिद्धार्थ चांदेकर मराठीत फक्त चॉकलेट बॉयच्या भूमिकेतच पहायला मिळतो. त्याचे ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ मधील काम सोडले तर तो एका चॉकलेट हिरोच्या रूपातच दिसत असतो. त्याचा या वेबसिरीजमधील वावर आणि भूमिका नक्की वेगळी आहे. पोलिस अधिकाऱ्याची भूमिका त्याने चांगली वठवली आहे. क्राईम स्टोरीच्या फॅनसाठी ही वेबसिरिज नक्कीच पर्वणी ठरू शकते. काही ठिकाणी कथानक रेंगाळल्या सारखे वाटू शकते. पण आपली उत्सूकता शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात नागेश कुकन्नुर आणि रोहित बानावलिकरचे लिखाण यशस्वी झाले आहे.