Mayor Ravi Landgeइंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार, प्रदुषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Mayor Ravi Landge : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रवी लांडगे यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड  : 23-02-2026 

महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदी प्रदूषित कऱणाऱ्या कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रवी लांडगे (Mayor Ravi Landge) यांनी दिला. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थीतीत सहन केले जाणर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर लांडगे आणि आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांच्या उस्थितीत ‘सात मावळे संवर्धन संस्थे’तर्फे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदीतील वाढते प्रदूषण रोखणे आणि सामूहीक जबाबदारीची जणीव निर्माण करणे हा या उपमक्रमाचा उद्देश होता.

स्वच्छता मोहिमेदरम्यान महापौर लांडगे स्वतः नदीपात्रात उतरून कचरा उपसण्याच्या कामात सहभागी झाले. पाहणीदरम्यान नदीत साचलेला प्लास्टिक कचरा, औद्योगिक सांडपाणी व इतर घातक घटक आढळून आले. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

महापालिका हद्दीतून नदीत सोडले जाणारे प्रदूषित सांडपाणी व औद्योगिक कचऱ्यास जबाबदार आढळणाऱ्या कंपन्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कऱण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून इंद्रायणी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोठा निर्णय  (Mayor Ravi Landge)

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

भाजप नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव कऱण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उस्फूर्त पाठिंबा दिला. चिचंवड येथील डी-मार्ट समोर 33.86 एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील 8.65 एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. महापौर रवि लांडगे यांनी या कामाची तातडीने संयुक्त पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही सुरू कऱण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाबद्दल महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून, हा निर्णय शहराच्या एकात्मतेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!