Breaking News : Marathi Is Complusary : आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय अनिवार्य असणार आहे. मराठी, इंग्रजीनंतर हिंदीला निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असणार आहे.
महाराष्ट्र : 2025-06-18
गेल्या काही महिन्यांपासून मराठी सह हिंदी हा विषय अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा होती. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांना आता खुद्द शिक्षणमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक ( Marathi Is Complusary ) असणार आहे, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. यासह इतर भाषेच्या शाळांमध्येही मराठी भाषा अनिवार्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे ? असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित करून, या सर्व चर्चांना फोल ठरवले.
हिंदी भाषा विषय अनिवार्य नाही.
हिंदी विषय घ्यायचा की नाही, हा त्या विद्यार्थ्याचा चॉईस असणार आहे. नव्या आदेशानुसार पहिलीपासून ते पाचवीपर्यंत हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. तर हिंदीएवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थी असणे त्या वर्गात अनिवार्य असणार आहे. त्यानंतर शाळा तो विषय शिकवण्याची तशी तरदूत करणार असल्याचे दादा भुसे म्हणाले, राज्यातील विद्यार्थी कुठेही कमी पडू नये, या उद्देशाने त्रिभाषा सुत्र राबवले जात असल्याचे भुसे म्हणाले. दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्त वापर होते. त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार हिंदी विषय शिकवला जाणार आहे.
राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत,यावर भुसे म्हणाले की, ही परिस्थिती खरी आहे, आणि ते वास्तव आपण स्विकारले पाहिजे. मात्र मराठी शाळा कशा वाचतील, त्यांचा विकास होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
Leave a Reply