Eiffel Tower, Paris – Symbol of the Centenary of the French Revolution – (Established – 1889)

Eifeel Tower

Table of Contents

आयफेल टॉवर, पॅरिस – फ्रेंच राज्यक्रांतीच्या शताब्दी महोत्सवाचे प्रतिक – (निर्मिती – इ.स.१८८९ )

एखाद्या जगप्रसिद्ध वास्तूविषयी आपण इतकी माहिती एकलेली असते. त्यामुळे त्या वास्तूला, ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देताना आपण अनेक गोष्टींचे आडाखे बांधलेले असतात. त्याविषयीची माहिती कितीही असली तरी ती वास्तू प्रत्यक्ष पहाणं, तेथील वातावरणाचा अनुभव घेणं हे फार रोमांचकारी असू शकतं. फ्रान्स या देशातील, पॅरिस येथील आयफेल टॉवर (Eiffel Tower) हे असेच एक ठिकाण आहे. याविषयीची माहिती आपण वर्षानुवर्षं एकत असतो. जेव्हा ही वास्तू आपण प्रत्यक्ष पहातो तेव्हा आपल्याला त्याविषयीची आणखी बरीच माहिती नव्याने समजते. म्हणूनच आम्ही मिसलेनियस भारत आणि वर्ल्डच्या वाचकांसाठी आयफेल टॉवरची सफर घडवणार आहोत.

Eiffel Tower

आयफेल टॉवर (Eiffel Tower) कोणी निर्माण केला ?

फ्रान्स मधिल पॅरिस येथील इंजिनियर गुस्ताव आयफेल यांच्या कंपनीमार्फत या टॉवरची निर्मीती करण्यात आली. म्हणूनच या वास्तूला आयफेल यांचे नाव देण्यात आले. आणि जगप्रसिद्ध वास्तू ‘आयफेल टॉवर’ याच नावाने आज प्रसिद्ध आहे.

कधी बांधण्यात आला हा मनोरा ?

इ.स. १८८७ ते १८८९ दरम्यान या भव्य मनोऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या मनोऱ्याला फ्रेंच भाषेत ‘ला देम दि फेर’ म्हणजे ‘आर्यन लेडी’ असेही म्हणतात.

आयफेल टॉवर ची निर्मिती का करण्यात आली ?

फ्रेंच राज्यक्रांतीला १०० वर्ष पूर्ण झाले त्याप्रित्यर्थ फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमध्ये अशी एखादी वास्तू बांधण्याचे ठरण्यात आले. त्यानुसार आयफेल टॉवरची निर्मीती करण्यात आली. सुरुवातीला या टॉवरवर अनेक फ्रेंच कलाकार, विचारवंतांनी टीका केली होती. हा टॉवर पॅरिसच्या सौंदर्यामध्ये बाधा ठरत आहे असे अनेकांचे म्हणणे होते. मात्र काळानुरूप हे मत बदलत गेले आणि आज ‘आयफेल टॉवर’ (Eiffel Tower) हे जगातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

Eiffel Tower

फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय ?

फ्रेंच राज्यक्रांती ही घटना जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. अठराव्या शतकातील ही घटना संपूर्ण जगावर दूरगामी परिणाम करणारी होती. या क्रांतीमुळे युरोपमधील सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली म्हणून आधूनिक युरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात. त्याचप्रमाण क्रांती ही संकल्पना इतिहास व राज्यशास्र यांत प्रथम अस्तित्वात आली, ती फ्रेंच राजक्रांतीनंतर व राज्यक्रांतीमुळेच.

आयफेल टॉवरचे (Eiffel Tower) आकारमान.

हा टॉवर ३३० मीटर ( १,०८३ फूट ) इतका उंच आहे. सामान्यपणे एखादी ८१ मजली इमारत जितकी उंच असेल तितकी या भव्य टॉवरची उंची आहे. पॅरिसमधील ही सर्वात उंच वास्तू आहे. या वास्तूचा पाया चौकोनी असून, चौकोनाची प्रत्येक बाजू १२५ मीटर (४१० फूट ) इतकी आहे. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना करता येईल.

आयफेल टॉवरचे रचनाकार.

मॉरिस कोचलिन आणि एमिल नोगुएर या दोन वरिष्ठ अभियंत्यांना या जगप्रसिद्ध वास्तूच्या रचनेचे श्रेय दिले जाते. हे दोघेही आयफेल यांच्या कंपनीसाठी काम करत होते. १८८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या शताब्दी सोहळ्यासाठी या वास्तूच्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. १८८४ मध्ये कोचलिन यांनी या वास्तूच्या प्राथमिक आराखड्याचे रेखाटन केले. पुढे स्टिफन सॉवेस्ट्रे यांनीही यात योगदान दिले.

प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ती २८ जानेवारी १८८७ मध्ये. आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) मुख्य भागाचे काम मार्च १८८९ मध्ये पूर्ण झाले.सुरुवातीच्या काळात हा टॉवर फक्त २० वर्षांसाठी ठेवण्यात येणार होता. नंतर त्याला नष्ट करण्यात येणार होते. मात्र त्या २० वर्षात या वास्तूला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि रेडियो टेलिग्राफीसारख्या उपयोगितेमुळे फ्रान्स सरकारने हा टॉवर कायमस्वरूपी जतन करण्याचा निर्णय घेतला.

आयफेल टॉवरच्या जगभरातील इतर प्रतिकृती.

आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) प्रसिद्धीमुळे त्याच्या इतर देशातही अनेक प्रतिकृती निर्माण करण्यात आलेल्या आहेत. मात्र आयफेल टॉवर इतकी प्रसिद्धी कोणाला खचितच मिळाली आहे. इंग्लडमधील ब्लॅकपूल टॉवर हे त्याचे पहिले उदाहरण म्हणता येईल. १८९४ मध्ये ब्लॅकपूलचे महापौर सर जॉन बिकरस्टाफ यांनी आयफेल टॉवर पाहून प्रभावित होऊन आपल्या गावात तसाच टॉवर बांधला. त्याची उंची १५८.१ मीटर (५१९ फूट ) उंच आहे. जपानमधील टोकियो टॉवर हा १९५८ मध्ये आयफेल टॉवरवरून प्रेरित होऊन निर्माण करण्यात आला. याशिवाय युनायटेड स्टेटस मध्ये टॉवरचे विविध स्केल मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत.

Eiffel Tower

आयफेल टॉवरची (Eiffel Tower) लोकप्रियता.

या ठिकाणाला दरदिवशी सुमारे २५ हजारापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. सशुल्क एखाद्या स्मारकाला भेट देण्याच्या यादीत आयफेल टॉवर प्रथम क्रमांकावर आहे. सन २००४ पर्यंत ३०० दशलक्षाहून अधिक पर्यटकांनी आयफेल टॉवरला (Eiffel Tower) भेट दिली होती. इतकी पॅरिस येथील या आयफेल टॉवरची प्रसिद्धी आहे. या टॉवरवर १९५७ ला टेलिव्हिजन अँटिना बसवण्यात आला. त्यामुळे त्याची उंची वाढली.

आयफेल टॉवरची देखभाल.

आयफेल टॉवर (Eiffel Tower) इतके जगप्रसिद्ध ठिकाण आहे. दररोज त्याला हजारो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे त्याची देखभाल ही तितकीच करावी लागते. दर सात वर्षांनी सुमारे ६० टन रंग (पेंट) या संपूर्ण टॉवरला लावण्यात येतो. ज्यामुळे हा लोखंडी टॉवर गंजत नाही. टॉवर बांधल्यापासून अत्तापर्यंत १९ वेळा तो पूर्णपणे रंगवण्यात आला आहे.

आयफेल टॉवरचे मूळ रंग.

हा टॉवर तीन छटांमध्ये रंगवण्यात आला आहे. या टॉवरचे शीर्षस्थान फिकट आहे. तर मध्यभागापासून तळापर्यंत गडद रंगवण्यात आलेला आहे. मूळ आयफेल टॉवरचा (Eiffel Tower) रंग लालसर तपकिरी होता. १९६८ ला याचा रंग कांस्य रंगात बदलण्यात आला. पॅरिसमध्ये होणाऱ्या २०२४ च्या ऑलम्पिक साठी हा टॉवर सोनेरी रंगात रंगवण्यात येत आहे.

आयफेल टॉवरचे खास वैशिष्ट्य.

या टॉवरच्या उभारणीत ज्या शास्रज्ञ, अभियंते आणि गणिततज्ञ यांनी योगदान दिले आहे त्या अशा ७२ फ्रेंच तज्ञांची नावे आयफेल यांनी कोरून घेतली आहेत.

टॉवरच्या बांधकामात वेळोवेळी करण्यात आलेले बदल.

इतक्या उंच वास्तूच्या बांधकामात सोयीनुसार काळानुरूप बरेच बदल करण्यात आले. टॉवर चढून जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लिफ्ट मध्ये अनेकवेळा तंत्रज्ञानाप्रमाणे बदल करण्यात आले आहेत .

टॉवरचा पाया.

या भव्यदिव्य टॉवरचा पाया हा चार भव्य स्तंभांवर उभा आहे. या चार स्तंभांच्या चार बाजूला दोन मजल्यापर्यंत पायऱ्या आणि लिफ्ट आहेत. दक्षिण स्तंभात फक्त दुसऱ्या मजल्यावर एक रेस्टॉरंट उघडण्यात आले असून तेथे सार्वजनिक लिफ्टने जाण्याची सोय आहे..

Eiffel Tower
Eiffel Tower

पहीला मजला.

पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आणि लिफ्ट दोन्हींचा वापर करता येतो.

दुसरा मजला.

येथे जाण्यासाठीही सार्वजनिक लिफ्ट आणि पायऱ्यांचा पर्याय उपलब्ध आहे. या मजल्यावर ले ज्युल्स वेर्ने नावाचे रेस्टॉरंट आहे. येथे पर्यटक थांबून इतक्या उंचावरून खालील परिसर पहात खाणपाणाचा आस्वाद घेतात. या मजल्यावरच्या काही भागांची फरशी ही आरपार अशा काचांची आहे. त्यामुळे खाली पाहीले की जमिनीवरचे लोक अगदी छोट्या छोट्या आकारात इतक्या उंचीवरून आपल्याला दिसतात. ही गंमत पहाणे मस्त अनुभव आहे. जे लोक पायऱ्या वापरून आयफेल टॉवर चढतात, त्यांच्या साठी या मजल्यावरचा हा रेस्टॉरंटचा ब्रेक विसाव्यासाठी उपयोगाचा ठरतो.

Eiffel Tower

तिसरा मजला.

तिसरा मजला हा सर्वात शेवटचा पर्याय आहे. जिथे सार्वजनिक लिफ्टद्वारे प्रवेश करता येतो. येथे पर्वी विविध प्रयोगांसाठी प्रयोगशाळा होत्या. याशिवाय पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी गुस्ताव्ह आयफेल यांचे एक आरक्षित छोटे अपार्टमेंट होते. आज हे सर्व पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र येथील एका खोलीला काचेची भींत असून आत आयफेल आणि शास्रज्ञ थॉमस एडिसन यांचे अप्रतिम बसलेल्या अवस्थेतील पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. हे सर्व आपल्याला बाहेरूनच बघता येते. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सर्वबाजूने काचेचे तावदानं लावून उंचावरून बाहेरील नयनरम्य परिसर बघण्याची सोय केली आहे. येथे आज एक छोटा बार आहे. येथे पर्यटक बराच वेळ घालवतात.

आयफेल टॉवरला (Eiffel Tower) भेट देताना काय काळजी घ्याल.

आयफेल टॉवर (Eiffel Tower) ही वास्तू दिवसाच्या दोन्ही वेळेस म्हणजे दिवसा आणि रात्री अशी पहाण्यासारखी आहे. तुम्ही रात्रीच्या वेळचा आयफेल टॉवर न पहाता तसेच पॅरिस शहर सोडले तर तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्कीच होऊ शकतो. आयफेल टॉवरच्यावरपर्यंत जाण्यासाठी तिकीटाचे दरसुद्धा भरमसाठ आहेत. त्यामुळे कोणता पर्याय तुम्ही त्यासाठी निवडणार आहात ते काळजीपूर्वक निवडा. त्यात अनेक पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. आपल्याला कोणत्या वेळी जमणार आहे, त्यानुसार तुम्ही दिवसाची वेळ नियोजीत करा. बाकी दवसभर पॅरिस शहर फिरून रात्रीचा लायटिंगने उजळलेला आयफेल टॉवर तुम्ही संध्याकाळी आठ नंतर कधीही बाहेरून पाहू शकता. त्याप्रमाणे तुमचे सर्व नियोजन करावे.

आयफेल टॉवर (Eiffel Tower) जर तुम्ही पहिले दोन मजले जरी चढून जाणार असाल तर फार मोजक्या सामानाची बॅग जवळ ठेवा. एक पाण्याची बाटली आणि पैसे इतकंच तुम्ही जवळ ठेवणे सोयीचे आहे. तुम्हाला भरपूर चालण्याची किंवा ट्रेकिंगची सवय असेल तर याच्या पायऱ्या चढत जाणे आनंददायक अनुभव ठरतो. मात्र जर तुम्हाला रोजची सवय नसेल तर मात्र तुम्ही पहिल्या मजल्यापासूनच लिफ्टने जाण्याचे तिकिट काढणेच उत्तम. पॅरिस हे शहर खिसेकापूंसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे जाताना आपल्या मूल्यवान वस्तू, पैसे, पाकिट हे सर्व सांभाळून येथे फिरणे उत्तम.

फोटोसेशनसाठीच्या जागा.

आयफेल टॉवर हे असे ठिकाण आहे, की पॅरिसच्या मध्यभागापासून ते रस्त्यांवरून दिसत रहाते. या वास्तूच्या समोर फोटो काढण्याची मोठी फॅशन आणि क्रेझ आहे. आयफेल टॉवरच्या मुख्य गेटच्या बाजूने म्हणजे तुम्ही तिकिट न काढताही बाजूच्या परिसरात राहून संपूर्ण आयफेल टॉवर येईल असे फोटो काढण्यासाठी पर्यटक खास तयारी करतात. येथे वेडींग फोटोशूटसाठीही बरीच गर्दी असते.

खरेदीसाठीचे पर्याय.

आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) परिसरात अनेक पथारीवाले, रस्त्यावर लहानमोठ्या वस्तू विकणारे तुम्हाला पावलोपावली दिसतात. येथे आयफेल टॉवरच्या प्रतिकृती विकत घेण्यासाठी अनेक पर्याय आहेत. दुकानातून ते घेण्यापेक्षा रस्त्यावर विक्रीकरणाऱ्यांकडून घेणे जास्त परवडणारे आहे. याशिवाय खरेदीसाठी युरोपमधील इतर वस्तू आपल्याला दिसतात.

रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या आयफेल टॉवरसमोर उभे राहून आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण टिपणे हा खरोखर अविस्मरणीय अनुभव आहे. तुम्ही जर पॅरिस शहराला भेट देत असाल तर आयफेल टॉवरला भेट देताना आपल्या खास पोषाखासह नक्की जा. तुमची ही भेट अविस्मरणीय करा. जर तुम्हाला उंचीचे अतोनात वेड असेल तर तुम्ही आयफेल टॉवरची भेट नक्कीच एन्जॉय कराल.

Eiffel Tower

2 thoughts on “Eiffel Tower, Paris – Symbol of the Centenary of the French Revolution – (Established – 1889)”

  1. Olá, você fez um trabalho fantástico, certamente irei gostar e recomendar pessoalmente aos meus amigos, tenho certeza de que eles se beneficiarão com este site

    Reply

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!