Dr.D.Y.Patil Passed Away

Dr.D.Y.Patil Passed Away : पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, माजी राज्यपाल आणि नवी मुंबई व पुणे येथे डी.वाय.पाटील विद्यापीठांची स्थापना केली.

कोल्हापूर : 04-08-2026 

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील ( Dr.D.Y.Patil Passed Away) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशातील शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांनी शिक्षणाचा प्रसार, आधुनिक शैक्षणिक संस्था उभारणी आणि विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.

डॉ.डी.वाय.पाटील यांचा परिचय ( Dr.D.Y.Patil Passed Away)

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ.डी.वाय.पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी मजल मारली. समाजसेवा, शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जातात. त्यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे होते.

राज्यपाल म्हणून कारकिर्द ( Dr.D.Y.Patil Passed Away)

राजकीय कारकिर्दीतही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या, काही काळ ते कॉंग्रेसपासून दूर राहिले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख कायम होती. शांत, संयमी आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मान मिळत होता. डॉ.पाटील यांनी त्रिपुरा,बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले. राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्यांचे पालन करत प्रशासनात समन्वय राखण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळाची विविध स्तरांवर प्रशंसा झाली होती.

उभारली विद्यापिठे ( Dr.D.Y.Patil Passed Away)

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सर्वाधिक ओळख म्हणजे नवी मुंबई आणि पुणे येथे उभारलेली डी.वाय.पाटील विद्यापीठे, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात या संस्थांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.

त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.

डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!