LPG Prices Reducedऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात, थेट 200 रुपयांनी केला स्वस्त

LPG Prices Reduced : केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारीत दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : 01-08-2026

केंद्र सरकारकडून (LPG Prices Reduced) दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर च्या दरात मोठी कपात केली आहे. व्यावसायिक एलपीडी सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त किमतीने कमी झाला आहे.

कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 209 आणि दिल्लीमध्ये 202 ने कपात कऱण्यात आळी आहे. या बदलानंतर, कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून 2872.50 असेल. यापूर्वी 1 जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 183.50 ने कपात केली होती. या कपातीनंतर, राजधानी दिल्लीत किंमत 2930 पर्यंत आली. कोलकातामध्ये किंमत 3255.50 वरून 3081.50 पर्यंत कमी झाली.

पाटणामध्ये 19 किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमत 3227 पर्यंत कमी झाली. 2026 मधील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतील ही पहिली मोठी कपात होती. इराणच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना महागाईपासून थोडा दिलासा मिळाला आहे. दिल्लीपासून पाटणा आणि कोलकातापर्यंत एलपीजीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

घरगुती सिलेंडर दरात कोणताही बदल नाही  (LPG Prices Reduced)

1 ऑगस्ट रोजी, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांपेक्षा जास्त कमी कऱण्यात आली होती. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र तशीच राहिली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार का ? (LPG Prices Reduced)

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का याबाबत सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. याचे एक कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलांच्या किंमतीत झालेली घट. मात्र, तेल कंपन्या किंवा सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. याचे एक कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घट. मात्र तेल कंपन्या किंवा सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी कऱण्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!