Kargil Vijay Diwas, 26 July 1999 : 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय युद्धाच्या इतिहातासील एक सुवर्णक्षण मानला जातो. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज उंचावला होता. हा दिवस ‘कारगील विजय दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊयात या महत्त्वाच्या ऐतिहासिक दिवसाविषयी.
कारगिल विजय दिवस : 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैनिक आणि सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाचा दिवस मानला जातो. 26 जुलै 1999 या दिवशी कारगील युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
Table of Contents
काय आहे या युद्धाची पार्श्वभूमीवर ? (Kargil Vijay Diwas)
कारगील (Kargil Vijay Diwas) हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून 205 किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मिरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगीलमध्ये काश्मिरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. येथे हिवाटळा अतिशय कडक असतो. तापमान उणे 40 अंश सेल्सियस असतो. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे.
कारगीलचे युद्ध होण्याचे मुख्य कारण हा रस्ता होते. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा 160 किलोमीटरच्या पट्ट्यात घुसखोरी केली होती. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून 5 हजार मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. यावेळी घुसखोरांनी कारगीलत नाही तर आग्नेकडील द्रास आणि नैऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी कऱण्यात आली होती.
का करण्यात आला होता हल्ला ? (Kargil Vijay Diwas)
कारगील, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यात सैन्य तैनात करून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजून सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान राहण्यायोग्य झाल्यावर, दोन्ही बाजूचे सैन्य आपापल्या चौक्यांवर परतले जावेत, असा अलिखित नियम भारत-पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये होता.
कारगील युद्ध छेडण्याच्या आगोदर पर्यंत हा नियम पाळला जात होता. मात्र 26 जुलै 1999 च्या वेळी भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्याक चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे कारगीलचे युद्ध पेटायला निमित्त मिळाले.
पाकिस्तानी घुसखोरांनी चौक्या ताब्यात घेतल्यामुळे, राष्ट्रीय महामार्ग 1 अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यात आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावारील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्याप्रमाणे होत्या, त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या फौजेची गरज लागणार होती. थंडीमुळे हे काम आणखी अवघड होणार होते.
करण्यात आली घुसखोरी (Kargil Vijay Diwas)
इ.स. 1998-99 च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले. व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त अत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग 1 च्या जवळ यायचे. असे केले की.
महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मिरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन तडीस नेणे, हा पाकिस्तानचा डाव होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला लावायचे. लडाख व सियाचिनला भारतापासून तोडणे सोप जाईल असे पाकिस्तानी युद्ध तज्ञांना वाटत होते. मात्र भारताने 1999 मधील जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया जिंकल्या आणि अनेक जागा परत मिळवल्या.
या युद्धाचे महत्त्वाचे टप्पे (Kargil Vijay Diwas)
- घुसखोरी : पाकिस्तानी सैन्याने आणि अतिरेक्यांनी नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारताच्या मोक्याच्या व उंच ठिकाणांच्या चौक्यांवर ताबा मिळवला.
- शोध : मे 1999 च्या सुरूवातीला स्थानिक चरवाहांनी व गस्ती पथकाने या घुसखोरीची माहिती भारतीय सैन्याला दिली.
- हवाई दल : परिस्थितीचे गांभिर्य ओळखून भारतीय हवाई दलाने 26 मे 1999 पासून ‘ऑपरेशन सफेद सागर’ अंतर्गत हवाई हल्ले सुरू केले.
प्रमुख लढाया आणि विजय (Kargil Vijay Diwas)
- टोलोलिंग आणि टायगर हिल : भारतीय सैन्याने अत्यंत दुर्गम व 16,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर अतिशय प्रतिकुल वातावरणात अभूतपूर्व पराक्रम गाजवला.
- हुतात्मे : या युद्धामध्ये भारताचे 527 वीर जवान शहीद झाले तर 1363 पेक्षा जास्त जवान जखमी झाले होते.
- विजय दिवस : भारतीय सैन्याने सर्व सामरिक ठिकाणे शत्रूकडून यशस्वीपणे परत घेत 26 जुलै 1999 रोजी विजय घोषित केले. हा दिवस दरवर्षी ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
- भारतीय सैनिकांच्या या शौर्यामुळेच आज आपण आजचा हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करू शकतो.