Ashadhi Wari 2026 Alandiवारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका ! इंद्रायणीला महापूर, देवस्थानने केले वारकऱ्यांना आवाहन.

Ashadhi Wari 2026 Alandi : आळंदीतील धोक्याची स्थिती पाहता, आळंदीत प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तरी सुरक्षेतच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीपासून अथवा त्यापुढच्या भागापासून सहभागी व्हावे.

आळंदी : 06-07-2026 

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरात (Ashadhi Wari 2026 Alandi ) पूरस्थिती निर्माण झाली आहे. आषाढी वारी सोहळादेखील अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण गेल्या चार दिवासंपासूनच्या पावसामुळे आळंदीतील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. अशी परिस्थितीत आळंदीतून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आळंदी देवस्थान प्रतिष्ठानकडून वारकरी भाविकांना आळंदीत न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली.

आळंदी देवस्थान कमिटी (Ashadhi Wari 2026 Alandi )

श्री आळंदी देवस्थान कमिटीचे पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी वारकरी भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे. ” आळंदी शहरात प्रवेश करण्याऱ्या इंद्रायणी नदीला पूर आला असून, नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. सध्या आळंदीत येणे सुरक्षित नाही. जे भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्या वाकरऱ्यांनी आसपासच्या परिसरात किंवा सुरक्षित ठिकाणीच थांबावे. आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, पूरपरिस्थिती पाहता देवश्तान वतीने आवश्यक त्या व्यवस्था केल्या आहेत. त्यामुळे वारकरी भाविकांनी आहे त्या ठिकाणीच सुरक्षितपणे थांबावे,” असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई वेधशाळा हवामान अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात आत (6 जुलै) रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याप्रमाणे देहू व आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणीसाठा वाढला आहे.

कधी होणार पालख्यांचे प्रस्थान ? (Ashadhi Wari 2026 Alandi )

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक 07 व 08 जुलै रोजी देहू व आळंदी येथून होणार आहे.

आळंदीतील धोक्याची स्थिती पाहता, आळंदीत प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीपासून अथवा त्यापुढच्या भागापासून सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना कऱण्यात आले आहे. याबाबत सर्वांनी संयम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.

बचाव पथकांचे कार्य  (Ashadhi Wari 2026 Alandi )

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून 220, इंद्रायणी नगरी येथून 100, ठाकूरबुवा मंडप येथून 60 आणि गोपाळपुरा येथून 28 अशा एकुण 408 भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील 150 गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!