PM Narendra Modi Urges : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन संकट आणि परकीय चलन वाचवण्यासाठी देशाला ‘वर्क फ्रॉम होम’ चा अवलंब कऱण्याचे आवाहन केले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रभावामुळे इंधन बचतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
हैद्राबाद : 10-05-2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेले इंधन संकट आणि वाढत्या महागाईवर मात कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Urges) यांनी देशवासीयांना एक मोठे आवाहन केले आहे. ” देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी आपण पेट्रोल -डिझेलचा वापर संयमाने केला पाहिजे आणि ‘ वर्क फ्रॉम होम’सारख्या पर्यायांना पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे” असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
Table of Contents
युद्धाचा भारतावर गंभीर परिणाम (PM Narendra Modi Urges)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. भारतही यापासून अलिप्त राहिलेला नाही. भारताकडे स्वतःचे मोठे तेलसाठे नाहीत किंवा विहिरी नाही. आपल्याला आपल्या गरजेचा बहुतांश पेट्रोल, डिझेल आणि गॅस साठा परदेशातून आयात करावा लागतो. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन आणि खतांचे दर गगनाला भिडले असून, याचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे.
कोरोना काळातील कार्यपद्धती पुन्हा अवलंबण्याची गरज (PM Narendra Modi Urges)
हैद्राबाद येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातील अनुभवांची आठवण करून दिली. ते म्हणाले.” कोरोना संकटकाळात आपण वर्क फ्रॉम होम’ ऑनलाईन मीटिंग्ज आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करण्याची नवी पद्धती विकसित केली होती आजच्या वेळेची गरज लक्षात घेता, त्याच व्यवस्थांचा पुन्हा वापर करणे देशहिताचे ठरेल. जर आपण या डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिले, तर अनावश्यक प्रवासाला आळा बसेल आणि इंधन बचतीला मदत होईल.
परकीय चलन वाचवणे हे राष्ट्रीय कर्तव्य (PM Narendra Modi Urges)
देशाच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी कऱण्यासाठी परकीय चलन वाचवण्यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. ” जगभरात पेट्रोल-डिझेल अत्यंत महाग झाले आहे. आपण जितकी इंधनाची बचत करू, तितकेच मौल्यवान परकीय चलन वाचवू शकू. हे केवळ आर्थिक गणित नसून, प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले. इंधन आयातीवर होणारा खर्च कमी झाल्यास तो पैसा देशाच्या इतर विकासकामांसाठी वापरता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकास आणि सुधारणांच्या मार्गावर भारत (PM Narendra Modi Urges)
पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत सध्या ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार असून आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे वेगाने विणले जात आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांची स्वप्ने साकार कऱण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी तेलंगणातील जनतेला विकासाटी खात्री दिली. केंद्राच्या योजनांचा वेग अधिक वाढवून राज्याचा कायापालट कऱण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.