Raj Thackeray On Marathi"मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून ? राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार .

Raj Thackeray On Marathi : राज ठाकरे यांनी पुण्यात मराठी अस्मितेवरून सरकार आणि परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. सचिन तेंडूलकरचे कौतुक आणि हिंदीच्या सक्तीवर त्यांनी काय म्हटले ? हे जाणून घ्या एका क्लिकवर.

पुणे : 30-04-2026 

“आम्ही मराठी बोलणार नाही, असं म्हणण्याची टॅक्सी-रिक्षा चालाकांची हिंमतच कशी होते ? जर ज्यांना मराठी येत नसेल, तर त्यांचे लायसन्स त्वरित रद्द करा,” अशी आक्रमक मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Marathi) यांनी केली आहे. पुण्यातील ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेत ‘ माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

हिंदी लादण्यावरून राज ठाकरेंचा प्रहार (Raj Thackeray On Marathi)

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, मराठी ही अत्यंत प्राचीन भाषा आहे, तर हिंदी अवघ्या 150-200 वर्षांपूर्वीची भाषा आहे. हिंदीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अजून हजार वर्ष लागतील, अशा शब्दांत त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर तोफ डागली. यावेळी त्यांनी बंगालमधील एक व्हिडिओ दाखवत, तिथले लोक स्वतःच्या भाषेसाठी किती कडवट आहेत याचे उदाहरण दिले.” तुम्ही जोपर्यंत आपल्या भाषेसाठी कडवट होत नाही, तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत,” असा सल्लाही त्यांनी मराठी भाषकांना दिला.

सचिन तेंडुलकरचे तोंडभरून कौतुक (Raj Thackeray On Marathi)

राज ठाकरे यांनी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे विशेष कौतुक केले. ” सचिन भारतरत्न असूनही आपली भाषा आणि राज्य विसरलेला नाही. वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम असो वा जागतिक व्यासपीठ, सचिन पहिले भाषण मराठीतच करतो, याचा मला अभिमान वाटतो,” असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी विनाकारण हिंदीत भांडणाऱ्या आणि चुकीची भाषा वापरणाऱ्या मराठी माणसांनाही खडेबोल सुनावले.

रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवर सरकारला फटकारले (Raj Thackeray On Marathi)

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे सक्तीचे आहे, मात्र काही संघटनांनी याला विरोध करत संपाटा इशारा दिला होता. यावर सरकारने माघार घेत 15 ऑगस्टपर्यंत कारवाई न कऱण्याचे आणि मराठी शिकवण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. “इतर राज्यांत, जसे की तामिळनाडू किंवा गुजरातमध्ये असे घडते का ? आपले मंत्री परप्रांतीयांना मराठी शिकायला वेळ का देतात ?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या चालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.

जातीपातीच्या राजकारणावर चिंता (Raj Thackeray On Marathi)

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सध्या जातीपातीच्या राजकारणात अडकला आहे. ” आम्ही महापुरूषांना जातीत विभागले आहे. लेखक आणि कवींची जात पाहून पुस्तके विकत घेतली जातात, हे दुर्दैवी आहे. या वादातून आपण बाहेर पडले पाहिजे, ” असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!