Mulund Metro Slab Collapseमुलुंड मेट्रो खांब दुर्घटनेतील मृत व्यक्ती आहे एका गावाचा सरपंच

Mulund Metro Slab Collapse : मुंबईतील मुलूंड (पश्चिम) भागात मेट्रोचे काम सुरू असताना अचानक सिमेंटचा एक ब्लॉग खाली कोसळला. हा खांब एका रिक्षावर आणि चार चाकी गाडीवर पडला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता या व्यक्तीची ओळख पटली आहे.

मुंबई : 14-02-2026 

आज शनिवारी 14 फेब्रुवारीला मुंबईतील मुलूंड भागात भीषण अपघात (Mulund Metro Slab Collapse)  झाला. मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन) च्या बांधकामादरम्यान एक मेट्रोमार्गावरील चालू बांधकामावरील खांब कोसळला. या खांबाचा सिमेंटचा काही भाग एका रिक्षावर आदळला. ही घटना दुपारी 12:15 वाजता एलबीएल रस्त्यावर मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील राजीव स्ट्रीट भागात,खांब (पियर ) क्रमांक P196 जवळ घडली. या अपघातात एका व्यक्ती जागीच मृत्यू झाला, तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता मृत व्यक्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

मृत व्यक्ती आहे सरपंच (Mulund Metro Slab Collapse)

उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंड परिसरात सरपंच यादव यांच्या मित्राचे ऊसाच्या रसाचे दुकान आहे. याच दुकानामध्य कळव्यातील एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी सरपंच आणि माजी सरपंच रिक्षाने निघाले होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास मेट्रोचा सिमेंड खांब कोसळून सरपंच रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरपंच मुंबईत फिरण्यासाठी आले होते. या मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

MMRDA चे अधिकृत स्पष्टीकरण (Mulund Metro Slab Collapse)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने या दुर्घटनेत स्पष्ट केले आहे की, मेट्रो मार्ग 4 च्या बांधकामादरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना मदत पुरवली. MMRDA ने सांगितले की,” आम्ही अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.” वेगळ्या टीममार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास लगेच कठोर कारवाई केली जाईल”

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या…(Mulund Metro Slab Collapse)

कॉंग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का ? आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड ज़ॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही?  फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटींग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याचं काय? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का ? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? मेट्रोची कामं वेगानं होत आहे, हे दाखवण्याचया नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का ? जबाबदारी कोणाची ? दरवेळी अशा घटना घटल्यानंतर फक्त ‘चौकशीचे नाटक करायचे. याची जबाबदारी कोण घेणार ? विकास हवा आहे, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!