Praful Patelराष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार एकमेव उमेदवार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

Praful Patel : महाराष्ट्रात अजितदादा पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाविषयीची चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार आहे.

मुंबई : 14-02-2026 

महाराष्ट्रात सध्या राजकीय चर्चांमध्ये सध्या एकच चर्चा सगळीकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाविषयी मतभेद दिसून येत आहे. याचदरम्यान महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी स्विकारतील, असेच चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन अध्यक्षपदाची आणि दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना, अजित पवार यांचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सर्व चित्र स्पष्ट केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार आहेत. लवकरच त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

दोन आठवड्यात निर्णय होणार (Praful Patel)

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, सुनेत्रा या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार आहेत आणि या विषयावर एकमत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या राज्याच्या  उपमुख्यमंत्री असल्याने  त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील.त्यामुळे त्या विधिमंडळ पक्षाचे नतृत्व करतील. पुढील दोन आठवड्यात या विषयावर निर्णय अपेक्षित आहे. प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही भाष्य केलेय विलीनीकरणापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले जात असल्याते त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात असा अंदाज बांधले जात होते. मात्र त्यांनी स्वतःच हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अजितदादा पवारांकडे असणाऱ्या अर्थखात्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!