Table of Contents
- प्रागमधील ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक ( स्थापना 1410), खगोलशास्राच्या आधारावरील एक जादुई घड्याळ !
- प्राग ॲस्ट्रॉनॉमिकल घड्याळाची निर्मिती ( Prague Astronomical Clock )
- प्राग ॲस्ट्रॉनॉमिकल घड्याळाचा इतिहास ( Prague Astronomical Clock )
- कोणी तयार केले हे अद्भूत घड्याळ ( Prague Astronomical Clock )
- ॲस्ट्रोनॉमिकल घड्याळ किंवा आर्लोज विषयीची अख्यायिका ( Prague Astronomical Clock )
- घड्याळाची झाली अनेकवेळा दुरूस्ती ( Prague Astronomical Clock )
- घड्याळ्याचे मुख्य आकर्षण ( Prague Astronomical Clock )
- आर्लोजचे करण्यात आलेले नुकसान आणि पुनर्बांधणी ( Prague Astronomical Clock )
- घड्याळाची खगोलशास्रीय डायल संकल्पना ( Prague Astronomical Clock )
- घड्याळाची स्थिर पार्श्वभूमी ( Prague Astronomical Clock )
- डायलमधील राशिचक्र रिंग ( Prague Astronomical Clock )
- ॲनिमेटेड हलत्या आकृत्यांचा अर्थ ( Prague Astronomical Clock )
प्रागमधील ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक ( स्थापना 1410), खगोलशास्राच्या आधारावरील एक जादुई घड्याळ !
युरोप खंडात फिरताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येते, की इकडे आजही प्रत्येक शहरातील ऐतिहासिक गोष्टी फार जपून ठेवल्या गेल्या आहेत. चेक रिपब्लिकन हा असाच एक देश. त्याची राजधानी आहे ‘ प्राग’. स्वप्नवत नगरी वाटावी असे हे ऐतिहासिक शहर. या शहराच्या चौका चौकांमध्ये तुम्हाला इतिहासाच्या खुणा सापडतील. प्रचंड मोठे पुतळे, जुन्या पद्धतीच्या वास्तू, चर्च आणि म्युझियम्स् यांनी हे शहर नव्या जुन्या मिलाफ करत आज उभे आहे. आज या शहरातील एका प्रसिद्ध वास्तूचा आपण आढावा घेणार आहोत. ‘द प्राग ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक’ ( Prague Astronomical Clock ) हे एक भन्नाट पर्यटन स्थळ आहे. चला तर मग आज आपण प्रागच्या या जादुई घड्याळ्याची सफर करूयात.
प्राग ॲस्ट्रॉनॉमिकल घड्याळाची निर्मिती ( Prague Astronomical Clock )
प्राग शहराच्या मध्यवस्तीतील एका भल्या मोठ्या चौकात हे घड्याळ उभारण्यात आलेले आहे. प्राग शहरात अशा अनेक वास्तू, स्मारकं आहेत, ज्यांची आगळीवेगळी ओळख आहे. त्यातील हे घड्याळ पर्यटनासाठीचे मुख्य आकर्षण आहे. ‘प्राग खगोलीय घड्याळ’ किंवा ‘प्राग ओर्लोज’ हे चेक प्रजासत्ताकची राजधानी असणाऱ्या ‘प्राग’ या शहरातील ओल्ड टाऊन हॉलशी जोडलेले एक मध्ययुगीन घड्याळ आहे. या घड्याळाचा सर्वात जुना भाग हा सुमारे 1410 मध्ये निर्माण करण्यात आला आहे. त्यात नंतर अनेकदा बदल झाले. मात्र या घड्याळाचा मुळ ढाचा मध्ययुगीन काळात तयार करण्यात आलेला आहे. या घड्याळाला ( Prague Astronomical Clock ) ऑर्लोजचे घड्याळ असेही म्हणतात.
प्राग ॲस्ट्रॉनॉमिकल घड्याळाचा इतिहास ( Prague Astronomical Clock )
या ऑर्लौजची निर्मीती मध्ययुगीन काळातली आहे. ऑर्लोजचा सर्वाज जुना भाग, यांत्रिक घड्याळ आणि त्याचा खगोलशास्रीय साचा (डायल) हा सुमारे 1410 च्या दरम्यानचा आहे.
कोणी तयार केले हे अद्भूत घड्याळ ( Prague Astronomical Clock )
कडान या ठिकाणी रहाणारे भविष्यवेत्ते मिकुलास आणि चार्ल्स विद्यापिठाचे गणित आणि खगोलशास्राचे प्राध्यापक जान सिंडेल यांनी हे घड्याळ तयार केले. या घड्याळ्याविषयीची माहिती सापडते ती 1410 मध्ये. 9 ऑक्टोबर 1410 रोजी या घड्याळ्याविषयीची नोंद सापडते. म्हणून या घड्याळाचा निर्मितीकाळ 1410 मानला जातो. त्यानंतर टप्प्या टप्प्याने तंत्रज्ञान जसे विकसित होत गेले, तसे त्यात बदल झाले. साधारण 1490 मध्ये या घड्याळ्याचे कॅलेंडर डायल बनवण्यात आले. आणि या घड्याळ्याच्या दर्शनी भागाला गॉथिक शिल्पांनी सजवण्यात आले.
ॲस्ट्रोनॉमिकल घड्याळ किंवा आर्लोज विषयीची अख्यायिका ( Prague Astronomical Clock )
सुरुवातीच्या काही काळ प्रागमधील जनता मानत होती की, आर्लोज ( Prague Astronomical Clock ) हे घड्याळ 1490 मध्ये जान रूझे ज्याला हनुश असेही संबोधत असत, यांनी बांधले आहे. मात्र ही एक मोठी ऐतिहासिक चुक असल्याचे दिसून आले. नंतर एक अख्यायिकाही प्रचलित झाली, की प्रागच्या नगरसेवकाच्या आदेशानुसार घड्याळ बनवणाऱ्या ‘हनुशला’ आंधळे करण्यात आले होते. ज्यामुळे तो असे अद्भूत घड्याळ पुन्हा तयार करु शकणार नाही. मात्र त्याला आंधळे करण्याआधी त्याने ते घड्याळ बंद केले आणि पुढील शंभर वर्षापर्यंत ते कोणीही दुरूस्त करू शकले नाही.
पुढे 1552 मध्ये जान तोबोर्स्की (1500-1572 ) यांनी आर्लोजची दुरूस्ती केली. ह्याच जान तोबोर्स्की यांनी क्लोकोत्स्का होराच्या घड्याळाची निर्मिती केली आहे. त्यांनी आर्लोजच्या घड्याळाविषयीची अधिक माहितीही लिहून ठेवली. त्यांनी त्यांच्या माहिती मध्ये नमूद केले आहे की, या घड्याळाचा निर्माता हनुश आहे. त्यांच्या या नोंदीमुळेच हनुश हा त्याचा निर्माता असल्याचा समज कायम होण्यास मदत झाली. कारण हनुश यांनी 1470-1473 मध्ये केलेल्या ओल्ड टाऊन हॉलच्या पुनर्बांधणी केली असल्यामुळे, हनुश हाच घड्याळाचा निर्माता असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले. मात्र ही माहिती चुक असल्याते म्हटले जाते. या घड्याळाची निर्मीती ही मिकुलास आणि जान सिंडेल यांनीच केली आहे.
घड्याळाची झाली अनेकवेळा दुरूस्ती ( Prague Astronomical Clock )
1552 नंतरच्या काळातील अनेक शतकांमध्ये या घड्याळाची दुरूस्ती करावी लागली. 2008 च्या ॲनिमेटेड चित्रपटात ‘गोट स्टोरी-द ओल्ड प्राग लेजेंडस’ मध्ये घड्याळाची ही अख्यायिका वापरून कथानक रचण्यात आले आहे.
घड्याळ्याचे मुख्य आकर्षण ( Prague Astronomical Clock )
या घड्याळाचे मुख्य दोन आकर्षणं आहेत. एक म्हणजे की हे घड्याळ खगोलशास्रीय परिस्थिवर आधारले आहे. आणि दुसरे या घड्याळात बसवण्यात आलेले लाकडी पुतळे. जे ठराविक कालावधीनंतर बाहेर येऊन, किती वाजले आहेत त्याचे तालबद्ध ठोके देऊन परत आत जातात. प्रागच्या मध्यचौकात असणाऱ्या या घड्याळाचे आकर्षण पर्यंटकांमध्ये याच पुतळ्यांनी दिलेल्या तासाच्या ठोक्यांमुळे आहे. 1629 किंवा 1659 मध्ये लाकडी पुतळे घड्याळाच्या आत बसवण्यात आले. 1787-1791 मध्ये या घड्याळाची मोठी दुरूस्ती करण्यात आली. यावेळी त्यात प्रागच्या प्रेषितांच्या आकृत्या याला जोडण्यात आल्या. पुढे जाऊन त्यात सोनेरी रंगाच्या आरवणाऱ्या कोंबड्याची प्रतिकृती जोडण्यात आली. 1865 -1866 च्या दरम्यान हा बदल करण्यात आला.
आर्लोजचे करण्यात आलेले नुकसान आणि पुनर्बांधणी ( Prague Astronomical Clock )
आज जगात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे हे आर्लोज घड्याळ, बऱ्याच मोठ्या हल्ल्यातून वाचलेले आहे. 7 आणि 8 मे रोजी प्रागच्या उठावाच्या वेळी या घड्याळाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. ओल्ड टाऊन स्क्वेअरच्या नैऋत्येकडे नाझींनी अनेक वाहनांमधून गोळीबार केला आणि अनेक उठाव केंद्रांपैकी एक असणाऱ्या या घड्याळावरही अयशस्वी हल्ला केला. हे आर्लोज घड्याळ नष्ट झाले नाही, मात्र त्याचे मोठे नुकसान झाले. हा ओल्ड टाऊन ह़ॉल आणि जवळपासच्या इमारती जळाल्या, घड्याळावरील लाकडी शिल्पे आणि जोसेफ मानेस यांनी बनवलेले कॅलेंडर डायल देखील जळून खाक झाल्या. या हल्ल्यानंतर घड्याळ दुरूस्तीसाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. यंत्रसामुग्रीची दुरूस्ती करण्यात आली, वोज्तेच सुचार्डा यांनी लाकडी प्रेषितांच्या मुर्तींची पुनर्बांधणी केली आणि 1948 मध्ये आर्लोज पुन्हा काम करू लागले.
2005 मध्ये पुन्हा एकदा याचे नुतणीकरण करण्यात आले आहे. घड्याळातील पुतळे आणि खालचा कॅलेंडर रिंगचा भाग पुर्नर्संचयित करण्यात आला. कबुतरांना दूर ठेवण्यासाठी लाकडी पुतळ्यांना जाळीने झाकण्यात आले आहे. ओल्ड टाऊन टॉवरच्या पुनर्बांधणीनंतर खगोलीय घड्याळाचे नूतनणीकरण जानेवारी ते सप्टेंबरमधील 2018 मध्ये करण्यात आले. विशेष म्हणजे या नूतणीकरणादरम्यान या घड्याळाची विद्यूत यंत्रणा बदलून पुन्हा 1860 च्या दशकातील मूळ यंत्रणेने घेतली. 1948 पर्यंत या घड्याळाची यंत्रणा विद्युत यंत्रणेवर होती. आज हे घड्याळ सर्वबाजूने सुरक्षित आणि पर्यंटकांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
घड्याळाची खगोलशास्रीय डायल संकल्पना ( Prague Astronomical Clock )
आर्लोजच्या खगोलशास्रीय डायलची संकल्पना ही यांत्रिक खगोलशास्राचे एक रूपच आहे. मध्ययुगीन खगोलशास्रात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे तंत्रज्ञान या घड्याळात वापरण्यात आले आहे. आपण या घड्याळाची अद्भूत संकल्पना समजावून घेऊ. हे घड्याळ म्हणजे एक ‘आदिम तारांगण’ मानून त्याची रचना करण्यात आली आहे. हे घड्याळरूपी तारांगण ते पृथ्वीच्या सापेक्ष विश्वाचे वर्तमान दर्शवते.
या घड्याळाची पार्श्वभूमी खगोलशास्रीय डायलच्या स्वरूपात त्याची पार्श्वभूमी मांडण्यात आली आहे. या घड्याळात दोन उभे पृथ्वी आणि आकाश दर्शवते आणि त्यांच्या सभोवताली चार मुख्य गतिमान घटक कार्यरत असतात. राशि चक्र, बाह्य फिरणारे घड्याळाचे रिंग, सूर्याचे प्रतिनिधित्व करणारे चिन्हे आणि चंद्राचे प्रतिनिधित्व करणारी चिन्हे, अशा स्वरूपात या घड्याळाच्या डायलची रचना करण्यात आलेली आहे.
घड्याळाची स्थिर पार्श्वभूमी ( Prague Astronomical Clock )
दर्शनी भागातून दिसणाऱ्या घड्याळाची पार्श्वभूमी ही पृथ्वी आणि आकाशाला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून करण्यात आलेली आहे. घड्याळाचा समोरील भाग म्हणजे पृथ्वी आणि आकाशाचे स्थानिक दृश्य दर्शवते. मध्यभागी जे निळे वर्तुळ आहे, ते पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते. वरचा निळा भाग हा आकाशाचा भाग आहे. लाल आणि काळा भाग क्षितिजाच्या खालील आकाशाला दर्शवते. दिवसा सूर्य हा निळ्या भागावर असतो आणि रात्री काळ्या भागावर असतो.
यात बसवण्यात आलेला यांत्रिक सूर्य हा पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी घड्याळातील पार्श्वभूमिवरील लाल भागावर स्थिर असतो. आकाशाकडील घड्याळाच्या पूर्वेकडील भागावर डावीकडे अरोरा म्हणजे लॅटिनमध्ये पहाट असे लिहिले आहे. ऑटर्स म्हणजे उगवणारा लिहिलेले आहे. पश्चिमेकडील भागात उजवीकडे ओकासस म्हणजे सूर्यास्त आणि क्रेपस्क्युलम म्हणजे संधिप्रकाश लिहिलेले आहे.
घड्याळाच्या निळ्या वर्तुळाच्या बाहेरील काठावरील सोनेरी रोमन अंक सामान्य 24 तासांच्या दिवसाची वेळ दाखवतात. हे घड्याळ स्थानिक प्राग वेळेनुसार किंवा युरोपिय वेळेनुसार वेळ दाखवते. घड्याळात डायलच्या निळ्या भागांमध्ये विभाजित करणारे वक्र सोनेरी रेषा असमान तासांसाठी दाखवतात. हे चिन्ह तासांसाठी आहेत. हे तास सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यानच्या वेळेच्या 1/12 म्हणून परिभाषित केले आहेत. आणि वर्षभरात दिवस मोठा किंवा लहान होताना ते बदलतात.
डायलमधील राशिचक्र रिंग ( Prague Astronomical Clock )
घड्याळाच्या डायलमधील मोठ्या काळ्या बाह्य वर्तुळाच्या आत राशीवर आधारित चिन्हांनी चिन्हांकित केलेल्या रचना आहेत. या रचना ज्या ग्रहणावर सूर्याचे स्थान दर्शवतात. ही सर्वे चिन्हे घड्याळाच्या विरूद्ध दिशेने दर्शविले आहेत. यातील लहान सोनेरी तारा स्थिनिर विषुववृत्ताची स्थिती दर्शवितो आणि तारकाचा काळ सोनेरी रोमन अंकांसह स्केलवर वाचता येतो. हे राशिचक्र यंत्राच्या आत 365 दातांची गियर यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. 365 दिवस हे एका वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतिक आहे. हे गियर 24 दातांच्या गियरद्वारे सूर्य गियर आणि चंद्र गियरशी जोडलेले आहेत. घड्याळातील सूर्य आणि चंद्राची स्थिती दर्शवणाऱ्या त्यांचा ग्रहणावर होणाऱ्या परिणाम दर्शवणाऱ्या यंत्रणा आहेत.
ॲनिमेटेड हलत्या आकृत्यांचा अर्थ ( Prague Astronomical Clock )
घड्याळाच्या बाजूला असलेल्या चार आकृत्या घड्याळ चालू असताना गतिमान अवस्थेत असतात. त्यावरील एक आकृती डावीकडून उजवीकडे, पहिली आकृती व्यर्थ आहे, जी आरसात स्वतःचे कौतुक करणारी आकृती दर्शवते. पुढे सोन्याची पिशवी धरलेला कंजुष लोभी सावकाराचे प्रतिनिधित्व करणारा पुतळा बसवण्यात आलेला आहे. घड्याळाच्या पलिकडे मृत्यू उभा आहे, अशी कल्पना मांडणाला सांगाड्याचा पुतळा आहे. हाच पुतळा जेव्हा घड्याळात प्रत्येक तास पुढे सरकतो, तेव्हा घंटा वाजवतो. हा सांगाडा जेव्हा टोल वाजवतो, तेव्हा बाकीच्या आकृत्या ह्या बाजूला सरकतात आणि जणू काही मृत्यूला असे सांगत आहेत,की आम्ही अजून जाण्यास तयार नाही.
दिवसाच्या प्रत्येक तासाला बारा प्रेषितांच्या त्यांच्या गुणधर्मांसह चितारण्यात आलेले पुतळे घड्याळ्याच्या वरील दारातून बाहेर येतात. खगोलीय घड्याळ्याच्या वरील डाव्या आणि उजव्या खिडक्या बाजूला सरकतात आणि या क्रमाने चौकातून आपल्याला प्रेषित बाहेर येताना दिसतात. या घड्याळाच्यावर एक कॅलेंडर बसवण्यात आलेले आहे. घड्याळ्याच्या वर्तुळाच्या काठावर निश्चित सुट्ट्या आणि 365 संतांची नावे असलेले चर्च कॅलेंडर आहे. बोर्ड महिन्यांचे रूपक प्रदर्शित करतो. लहान प्रतिमा राशिचक्र चिन्हांचे प्रतिनिधित्व करतात.
कॅलेंडरच्या पुढे एक तत्वज्ञानी, डायलच्यावरच्या बाजूला बोट दाखवणारा मुख्य देवदूत मायकेल, एक खगोलशास्रज्ञ आणि एक इतिहासकार उभा आहे. जर तुम्ही प्राग शहराला भेट देणार असाल, तर या घड्याळाला भेट देण्याआधी त्याविषयीची तांत्रिक माहीती नक्की मिळवा. कारण तिथे भेट देऊन, हे घड्याळ प्रत्यक्ष पहाताना तुम्हाला त्याती गंमत समजू शकेल. यासाठी या घड्याळाची तांत्रिक माहिती, खगोलशास्रातील संकल्पना समजून घ्या. म्हणजे या पर्यटन स्थळाचा तुम्हाला खरा आनंद मिळू शकेल.
प्रत्येकी एक तासाचे जे टोल वाजतात, त्यावेळी प्रागच्या या चौकात पर्यटकांची खुप गर्दी येथे होते. त्यामुळे तास पूर्ण होण्याच्या काही मिनिटं आधी तुम्ही या घड्याळाच्या चौकात त्याच्यासमोरची जागा पकडून उभे रहा. तरच या घड्याळ्याच्या आतील पुतळे, प्रेषितांच्या प्रतिकृती, खगोलीय आणि तांत्रिक बाजू समजून घेता येतील. लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही या घड्याळाचे आकर्षण वाटते, त्यातील खगोलीय माहिती लक्ष वेधून घेते. चेक रिपब्लिकला भेट दिली, तर प्रागचे हे अद्भूत घड्याळ न चुकता बघा.
Thanks for sharing your knowledge. This added a lot of value to my day.
You’ve sparked my interest in this topic.
Thank You
I love how clearly you explained everything. Thanks for this.
Your content always adds value to my day.
This post cleared up so many questions for me.
This post cleared up so many questions for me.
Thank You
Keep writing! Your content is always so helpful.
Thank You
You’ve done a great job with this. I ended up learning something new without even realizing it—very smooth writing!
Thank You
This gave me a whole new perspective. Thanks for opening my eyes.
Thank You
I’ve bookmarked this post for future reference. Thanks again!
You always deliver high-quality information. Thanks again!
You always deliver high-quality information. Thanks again!
Your articles always leave me thinking.
I love how clearly you explained everything. Thanks for this.
I enjoyed your perspective on this topic. Looking forward to more content.
I really appreciate content like this—it’s clear, informative, and actually helpful. Definitely worth reading!
I appreciate the depth and clarity of this post.
This article came at the perfect time for me.
This topic is usually confusing, but you made it simple to understand.
You’ve clearly done your research, and it shows.
Posts like this are why I keep coming back. It’s rare to find content that’s simple, practical, and not full of fluff.
Very useful tips! I’m excited to implement them soon.
This was so insightful. I took notes while reading!
You really know how to connect with your readers.
This gave me a whole new perspective on something I thought I already understood. Great explanation and flow!