Zubeen Garg Death

Zubeen Garg Death : प्रसिद्ध गायक जुबीन गार्ग यांचे निधन झाले आहे. त्यांनी गँगस्टर या चित्रपटासाठी गायलेले ‘ या अली’ हे गाणे तुफान गाजले होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मुंबई : 19/09/2025

हिंदी सिनेमासृष्टीसाठी एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग  (Zubeen Garg Death)  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुबीन यांचे गँगस्टर चित्रपटातील ‘ या अली’ हे गाणे तुफान गाजले होते. नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जुबीन हे सिंगापुरला गेले होते. तेथे स्कुबा डायविंग करताना त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जुबीन यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

जूबीन हे सिंगापूर नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. त्यापूर्वी ते स्कूबा डायविंगसाठी गेले होते. स्कूबा डायविंग करत असताना जुबीन हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

स्कूबा डायविंग करताना झाला अपघात  (Zubeen Garg Death)

मीडियाच्या माहितीनुसार, जुबीन यांचा स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघात झाला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी जुबीन यांना वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले होते. पण उपचारांना यश आले नाही. अखेर जुबीन यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.य

जुबीन यांच्या कारकिर्दीविषयी

जुबीन हे एक प्रतिभावान गायक होते. गायक, अभिनेते आणि लेखक अशी त्यांची तिहेरी ओळख होती. जुबीन यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी मेघालयामध्ये झाला होता. असमिया भाषेबरोबरच जुबीन यांनी बंगाली, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, मराठी, मिसिंग, नेपाळी, ओ़डिया, संस्कृतसारख्या जवळपास 60 भाषांमध्ये गाणी गायली होती.

गँगस्टर मधील गाण्याला विशेष प्रसिद्धी

कंगणा रणौत, इम्रान हश्मी, शाईनी आहूजा यांच्या गाजलेल्या गँगस्टर चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या ‘ या अली’ गाण्याला विशेष प्रसिद्धी मिळाली होती. जुबीन यांना जवळपास 12 प्रकारचे संगीत वाद्ये वाजवायला येत असे. जुबीन यांचे पूर्ण नाव झुबीन बोरठाकुर गार्ग होते. 1995 मध्ये जुबीन मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी इंडिपॉप अल्बम चांदणी रात लॉंच केला. त्यांनी दिल से (1998) , डोली सजाके रखना (1998), फिझा (2000 ), कान्टे (2002) सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली होती.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!