• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • World Elder Abuse Awareness Day 2025;Current Objectives, history and Significance : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन 2025; इतिहास, उद्दिष्ट आणि महत्त्व.
World Elder Abuse Awareness Day

World Elder Abuse Awareness Day 2025;Current Objectives, history and Significance : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन 2025; इतिहास, उद्दिष्ट आणि महत्त्व.

World Elder Abuse Awareness Day 2025 : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस ( WEAAD ) दरवर्षी 15 जूनला साजरा केला जातो. जरासा वेगळा विषय असणारा हा दिन का साजरा केला जातो,त्याची सुरूवात कशी झाली, त्याचे काय महत्त्व आहे यासगळ्याती माहिती आपण या लेखात घेणार आहोत. 

जगभरात जसजसे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली आहे, त्याचप्रमाणात मानवाचे आयुष्यमान वाढले आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगात लोकसंख्या वाढत आहे. मानवाचे आयुष्यमान वाढल्यामुळे वृद्ध व्यक्तीचे सरासरी प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत वृद्ध, वयस्कर माणसांची लोकसंख्या वाढत आहे. त्यांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे प्रश्नसुद्धा वाढत आहेत. अशा परिस्थितीत या वृद्धांशी वागणूक, त्यांच्याशी करण्यात येणारा दुरुपयोग ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. या समस्या वृद्धांच्या आरोग्यावरच परिणाम करतात असे नाही, तर त्यांच्या मानव अधिकारांवरही गदा आणतात. वृद्धांशी जर कोठे गैरव्यवहार होत असतील, तर ते त्यांच्या मृत्यूचेही कारण होई शकतात. या सर्व समस्यांवर उपाय मिळावेत आणि चर्चा व्हाव्यात यासाठी जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. 

वृद्धांवरील अत्याचार कशाला म्हणतात ? 

आपण आपल्या आजूबाजूला समाजात कायमच वृद्ध व्यक्तींशी होणारे दुर्व्यवहार बघत असतो. ही एक वरवर सामान्य वाटणारी समस्या आहे. मात्र याचे अनेक प्रकार आहेत. कधी कधी या वृद्धांची कुटुंबात उपेक्षा केली जाते. त्यांच्या पैशांचा गैरवापर केला जातो. त्यांचे मानसिक, शारिरीक शोषण होते. त्यांनाही सन्मान आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे एका चांगल्या समाजाचे लक्षणं आहेत. 

जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस : इतिहास   (World Elder Abuse Awareness Day 2025)

या दिवसाला संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्ताव 66/127 ला संमती देऊन इंटरनॅशनल नेटवर्क फॉर द प्रिवेंशन ऑफ एल्डर एब्यूज (INPEA) या संस्थेच्या प्रस्तावानंतर याला अधिकृतपणे मान्यता दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या  माहितीनुसार जवळजवळ 6 मधून 1 वृद्धव्यक्ती समाजातील दुर्व्यवहाराचा अनुभव घेते.  पुढील काळातील जगभरातील वृद्धांच्या परिस्थितीवर ही आकडेवारी भाष्य करते. समाताजील तरूणांकडून मिळणाऱ्या दुर्लक्षामुळे वृद्धांच्या मानसिक आणि शारिरिक परिस्थितिवर परिणाम होतो. त्यामुळे हा आता वैश्विक मुद्दा बनला आहे. जगातील वृद्धांची काळजी घेणे, त्यांना सन्मानाने वागवणे , त्यांच्या समस्या जाणून घेणे ही सर्वांची सामाजिक बांधिलकी असणार आहे. 

संशोधन सांगते की, पुढील काळात म्हणजे 2050 पर्यंत 60 वर्षे वयाच्या पुढील लोकांची लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येतील तरूणांच्या लोकसंख्येलाही पार करणार आहे.  त्यामुळे समाजातील वृद्धांच्या समस्या आणि आव्हानेही वाढणार आहेत. यात त्यांचे आर्थिक, शारिरिक शोषण, उपेक्षा,हिंसा अशा मुद्यांवर त्यांच्यासाठी काम करावे लागणार आहे. जागतिक आरोग्य संघनेच्या आकडेवारीनुसार, प्रत्येकी 4 ते 6 वृद्ध व्यक्ती या कोणत्या कोणत्या प्रकारच्या दुर्व्यवहाराचा बळी ठरतात. जगात 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोमानाच्या लोकांची लोकसंख्या वाढत आहे. 2015 मध्ये ती 900 मिलियन होती तर 2050 मध्ये ती 2 बिलियन इतकी होऊ शकते. त्यामुळे जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस साजरा करणे काळाची गरज असणार आहे. 

जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस – उद्देश (World Elder Abuse Awareness Day 2025)

या दिवसाचा मुख्य उद्देश हाच आहे की, या दिवसाच्या निमित्ताने वृद्धांच्या समस्या आणि उपाययोजना यांवर चर्चा घडवून आणणे. वृद्धांविषयी एक सजग जाणीव निर्माण करणे. ज्या वृद्धांना घरात, समाजात उपेक्षा मिळते त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी या दिनाचा उपयोग होऊ शकतो. समाजातील असे वृद्ध ओळखणे आणि त्यांना मदतीचा हात देणे हे याचे उद्दिष्ट आहे. अशा काही संस्था निर्माण करणे, की जेणेकरून प्रशासन आणि समाज त्यांना आनंदी, निरोगी आणि सन्मानाने जगण्याचे बळ देईल. म्हणून या दिवसाती जास्तीत जास्त जागरूकता होणे आवश्यक आहे. 

कसा साजरा करू शकता तुम्ही हा दिवस ? 

पर्पल कलर : पर्पल कलर ही या दिवसाच्या कपड्याची थिम आहे. या दिवशी हे कपडे परिधान करून तुम्ही या दिवसाला पाठिंबा देऊ शकता. 

माहिती सांगा : तुमच्या सोशल मीडियावरून किंवा माहितीतील लोकांना या दिवसाविषयी सजग करा. 

संस्थांना भेटी द्या : वृद्धांसाठीच्या संस्थांना भेटी द्या, त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. 

तुमच्या घरातील , ओळखीतील वृद्ध व्यक्तींना भेट द्या. त्यांच्या समस्या जाणून घ्या.  

आज फक्त युरोप, अमेरिकेत एकट्या वृद्धांच्या समस्या पुढे येत आहेत. येथे वृद्धत्वातही एकटे रहाण्याचे प्रमाण खुप आहे. परंतु हळूहळू भारतासाऱख्या भक्कम कुटुंबपद्धतीची प्रथा असणाऱ्या देशातही हळुहळु हे चित्र दिसू लागले आहे. तेव्हा पुढील काळात तरुणांनी समाजातील या इतक्या मोठ्या घटकांच्या समस्यांची माहिती करून घेत, त्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी हातभार लावलाच पाहिजे. हीच सकस समाजाची गरज असणार आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025