Iran -Isareal War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका एका युद्धात ढकलली जात आहे. इराणच्या बाबत अमेरिका आता काय धोरण आखणार हे महत्त्वाचे ठरणारे आहे.
आंतरराष्ट्रीय : 2025-06-23
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सोमवारी (23 जून 2025 ) रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहे. त्यापूर्वी पुतिन यांचे निकटवर्तिय आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मदवेदवे यांनी असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. सध्या का सुरू आहे या देशांमध्ये ? हे जाणून घेऊन.
काय म्हणाले आहेत मेदवेदेव ?
रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर आरोप केला की, त्यांनी अमेरिकेला एका नव्या युद्धात ढकलले आहे. मेदवेदेव म्हणाले, “शांतता प्रस्थापित करणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून आलेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी नवे युद्ध सुरू केले आहे”.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्रश्न उपस्थित करताना रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, या हल्ल्यात इराणच्या पायाभूत सुविधांचे विशेष नुकसान झाले नाही किंवा केवळ किरकोळ नुकसान झाले आहे. ते म्हणाले, ” आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो की, इराण भविष्यात अणवस्रांचे उत्पादन सुरू ठेवेल”.
अनेक देश इराणला अणवस्र पुरवण्यास तयार – दिमित्री मेदवेदेव
दिमित्री मेदवदेव यांनी दावा केला की, ” अनेक देश इराणला थेट आपली अणवस्त्रे पुरवण्यास तयार आहेत. मात्र ते कोणत्या देशांबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मेदवेदेव पुढे म्हणाले की. इस्रायलची लोकसंख्या आता सतत धोक्यात जगत आहे, देशाच्या अनेक भागात स्फोट होत आहेत. अमेरिका आता एका नव्या संर्घषात अडकली आहे, ज्यात जमिनीवर कारवाई होण्याती शक्यता दिसत आहे.
त्यांनी असेही म्हटले की, या हल्ल्यामुळे इराण राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. रशियन नेते म्हणाले, इराणचे राजकिय शासन टिकून आहे आणि कदाचित ते आणखी मजबूत झाले आहे, लोक देशाच्या अध्यात्मिक नेतृत्वाभोवती एकत्र येत आहेत. ज्यात ते लोकही सामील आहेत, जे पूर्वी याबाबत उदासीन किंवा विरोधी होते.
आता अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही : अराघची
दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सध्याच्या परिस्थितीत तेहरान अणुकरार चर्चेच पुन्हा सहभागी होईल, हे नाकारले आहे. ते म्हणाले , आम्ही कूटनीतीच्या मध्यात होतो. आम्ही अमेरिकेशी चर्चा करत होतो. तेव्हा इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला. ते म्हणाले की, अमेरिकेच्या हल्ल्याच्या अवघ्या दोन दिवस आधी जिनिव्हामध्ये युरोपीय मध्यस्थांशी चर्चा सुरू होती. याच दरम्यान अमेरिकेने आमच्या अणुस्थलांवर हल्ला केला. इराणने नव्हे, तर अमेरिकेने विश्वासघात केला आहे.
Leave a Reply