Nilesh Chavan Vaishnavi Hagvne

Vaishanavi Hagwane Case Update : पुण्याच्या मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. आरोपी निलेश चव्हाणच्या घराची पोलीसांकडून झडती सुरू केली आहे. त्याच्या घरातून अशा काही गोष्टी सापडल्या तर त्या वस्तूंमार्फत वैष्णवीच्या छळाचे पुरावे मिळणार आहेत. 

पुणे : 2025-05-31

पुणे शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane )  आत्महत्या प्रकरणाने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात दररोज नविन घडामोडी घडत आहेत. काल या प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निलेश चव्हाण याला पोलीसांनी  शुक्रवारी नेपाळमधून अटक केली. त्याच्या घराची आज झडती घेण्यास सुरूवात केली आहे. पोलीस निलेश चव्हाण याला त्याच्या कर्वेनगर च्या घरी घेऊन गेले आहेत. सध्या वैष्णवीचा छळ करून, तिला आत्महत्या करण्याच्या आरोपाखाली तिचा सासरा, नवरा, दिर, सासू आणि नणंद हे सर्व अटकेत आहेत. निलेश चव्हाण हा फरार होता.

पिंपरी-चिंचवड पोलीस निलेश चव्हाण याला त्याच्या कर्वे नगरच्या घरी घेऊन गेले आहेत. वैष्णवीची सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल निलेश चव्हाण कडे होते. ते मोबाईल मिळवण्यासाठी निलेश चव्हाणच्या घराची झडती सुरू केली होती. आता त्या दोघींचे मोबाईल पोलीसांनी जप्त केले आहेत. 

निलेश चव्हाणवरील आरोप 

वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचा निलेश चव्हाण हा मित्र आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ याच्या ताब्यात होते. हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूकीच्या धाकाने त्याने हाकलून दिले होते. यादरम्यान त्याने वैष्णवीचे बाळ जनक हगवणे याची हेळसांड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

निलेश चव्हाणने वैष्णवीच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी बाळाला कस्पटे कुटुंबाकडे सूपुर्त केले. मात्र तो फरार झाला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आधी रायगडला पोहोचला. तेथून तो गाडीने दिल्लीला गेला. दिल्लीहून गोरखपूर, उत्तरप्रदेशला पोहोचला. भारताची बॉर्डर क्रॉस करून तो नेपाळला गेला होता. मात्र पोलीसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले. वैष्णवीच्या सासू आणि नणंदेचा त्याच्या ताब्यातील मोबाईल मिळाले असल्याने, आता  या प्रकरणातील अनेक धागेदोरे मिळणार आहेत. त्यासाठी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!