US-Bangladesh Trade : अमेरिकेने पुन्हा एकदा एक करार करून भारताला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीने मात्र बांगलादेशला निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने बांगलादेशी कापड आयातींवरील शुल्क कमी केले आहे. पण ही बाब भारतासाठी तितकी चांगली नसल्याचे बोलले जात आहे.
ढाका : 10-02-2026
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने भारतासाठी एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या शेजारील देशाला निवडणुकीपूर्वी एक दिलासा दिला आहे. बांगलादेश आणि अमेरिकेतील व्यापार कराराअंतर्गत (US-Bangladesh Trade) बांगलादेशी वस्तूंवरील शुल्क कमी केले आहे. यामुळे बांगलादेशाला मोठा आधार मिळाला आहे. पण यामुळे दक्षिण आशियातील व्यापारी समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडणार आहे.
अमेरिका बांगलादेश द्विपक्षीय व्यापार (US-Bangladesh Trade)
अमेरिका आणि बांगलादेश व्यापार करारांतर्गत अमेरिकेने कच्चा मालापासून बनवलेल्या कापड उत्पादनांवरील शुल्क शून्य केले आहे. तर काही उत्पादनांवरील शुल्कात घट करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशाच्या कापड उद्योगाला अमेरिकेने बाजारात प्रवेश मिळणार आहे. मोहम्मद युनूस यांनी या करारामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मोठी मदत मिळेल, असे म्हटले आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत अमेरिकेने बांगलादेशवरील परस्पर शुल्क देखील 19 % पर्यंत कमी केले आहे. .यापूर्वी 37 % कर बांगलादेशवर लावण्यात येणार होता, पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा कर 2 % पर्यंत कमी झाला आणि आता पुन्हा यामध्ये मोठी सवलत देण्यात आली आहे.
बांगलादेशच्या कापड उद्योगाला उभारी मिळणार (US-Bangladesh Trade)
अमेरिकेशी द्वीपक्षीय व्यापार करार आणि कमी शुल्कामध्ये बांगलादेशच्या कापड उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे बांगलादेशच्या कापड उद्योगाला अमेरिकेच्या बाजारात प्रवेश मिळणार आहे. तसेच जागतिक कापड साखळी पुरवठ्यातबी बांगलादेशचे स्थान मजबूत होणार आहे. यामुळे कापड उद्योगाची निर्यात वाढून बांगलादेशच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार शेख बसी आणि सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारंतर्गत बांगलादेशमध्ये नॉन-टॅरीफ अडथळे कमी करण्याची सहमती दोन्ही देशांनी दिली आहे.
भारतासाठी चिंतेचे कारण का ? (US-Bangladesh Trade)
अमेरिका आणि बांगलादेशमधील हा करार भारतातासटी चिंतेची बाब बनला आहे, अमेरिकेच्या बांगलादेशी कापड उत्पादनांवरील शुल्क कमी केल्याने याचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात बांगलादेश भारताचा कट्टर स्पर्धक आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने दिलेल्या या व्यापारातील शुल्क सवलतीमुळे भारतापुढील आव्हान आणखी कठीण होणार आहे. या सवलतीमुळे भारताच्या कपड्यांपेक्षा बांगलादेशातील कपड्यांना आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका या करारामुळे भारतापेक्षा बांगलादेशीय कपड्यांच्या खरेदीला पसंती देणार आहे. अमेरिका भारतीय कापड व्यवसायातील मोठा निर्यातीसाठी मोठा भागीदार आहे. या निर्णयामुळे भारताच्या निर्यातदारांना मोठा फटका बसणार आहे.