Russia -Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता भीषण परिस्थीतीला पोहोचले आहे. युक्रेनसुद्धा आता रशियावर ताकदीने हल्ला करत आहेत. युक्रेनन् पुन्हा एकदा रशियावर असाच हल्ला केला आहे. यात रशियाचे तब्बल 1100 सैनिक ठार झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय : 2025-06-03
Russia and Ukraine War सध्या रशिया आणि युक्रेन (Russia -Ukraine War) यांच्यातील युद्धाने आता चांगलाच पेट घेतलेला आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंत सर्वात मोठा हल्ला केला आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर रशियानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. रशियानेही ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्र डागले आहेत. यात युक्रेनमधील अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या या हल्ल्याप्रतिहल्ल्याने या युद्धाने आता आणखी एक नवे वळण घेतले आहे.
युक्रेनने केलेल्या नव्या हल्ल्यात रशियाचे तब्ब्ल 1100 सैनिक मारले गेले असल्याचा दावा केला जात आहे. युक्रेनच्या जनरल स्टाफनुसार युक्रेनच्या लष्कराने गेल्या 24 तासात रशियाचे 1100 सैनिक मारले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सैनिक हे कुर्क्स आणि सुमी या भागात तैनात होते. युक्रेनच्या जनरल स्टाफचा हा दावा खरा मानला तर, युक्रेनने आतापर्यंत रशियाचे तब्बल 990,800 सैनिक मारले आहेत.
वृत्तसंस्थेचा दावा
युक्रेनच्या या दाव्याबाबत द किव इंडिपेंन्डन्ट या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गेल्या 24 तासात युक्रेनने आपल्या ताज्या स्ट्राईकमध्ये 1100 सैनिकांना ठार केलं आहे. ऱशियाकडे रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे एकुण सात नागरिक ठार झाले आहेत. युक्रेनने रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप काहीही सांगितले नाही. रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांत युक्रेनने रशियाच्या आणखी 12 विमानांना नष्ट केलं आहे. तसेच आपल्या या हल्ल्यात रशियाच्या एकुण 7 टँकदेखील उद्धस्त झाल्याचा युक्रेनने केला आहे. युक्रेनने आत्तापर्यंत 384 विमानं नष्ट केली आहेत.
शांततेसाठी चर्चा झाली पण …
युद्ध थांबवण्यासाठी इस्तंबुलमध्ये दोन्ही देश एकत्र आले होते. एकिकडे युद्धबंदीवर चर्चा होत असताना, दोन्ही देश एकमेकांवर जोमाने हल्ले करत आहेत. टर्की देशाच्या इंस्तंबुल येथे 2 जून रोजी शांततेसाठी दोन्ही देशांचे प्रतिनीधी एकत्र आले होते. या बैठकीत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. मात्र रशियाचा प्रस्ताव युक्रेनन् मान्य केला नाही. त्यामुळे या बैठकीतून कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही.
युक्रेनेन रशियाचे केलेले हे नुकसान बघता आता रशिया याला कसे उत्तर देते याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply