Ukrain-Russian War

Ukrain-Russian War : युक्रेनने सलग केलेल्या हल्ल्यांना रशियाने आता प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने बुधवारी (4 जून ) घोषणा केली आहे की, आम्ही युक्रेनच्या दोन महत्त्वपूर्ण शहरांवर ताबा मिळवला आहे. 

मॉस्को  : 2025-06-04

मागच्या तीन दिवसांपासून युक्रेनने रशियाच्या  (Ukrain-Russian War ) अंतर्गत भागात घुसून हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देत रशियाने पलटवार केला. रशियाने युक्रेनने केलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांमध्ये दोनवेळा युद्धबंदी आणि शांततेसाठी चर्चा झाल्या आहेत.मात्र तरीही त्यांच्यातील हे भीषण युद्ध बघायला मिळत आहे. बुधवारी रशियाने घोषीत केले आहे, की रशियाने युक्रेनच्या दोन महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला आहे. दोन्ही शहरांवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करून, रशियाचा ध्वज फडकवला आहे. 

युक्रेनने  रविवारी रशियावर अत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. हा हल्ला रशियाच्या अंतर्गत भागात होता. सुमारे 18 महिन्यांच्या तयारी नंतर युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने लैन्स ट्रकने रशियाच्या चार प्रमुख सैन्याच्या हवाई अड्ड्यावर हल्ला केला. यात रशिाचे कमीत कमी 40 विमाने नष्ट झाली. यानंतर मंगळवारी रशियातील क्रीमिया ब्रिजला युक्रेनने बॉम्बने उडवून दिले.या हल्ल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमर पुतिन यांना मोठ्या चिंतने घेरले आहे.

युक्रेनच्या दोन शहरांवर रशियाचा ताबा (Ukrain-Russian War )

रशियाने युक्रेनी हल्ल्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे. रशियाने बुधवारी युक्रेनच्या सूमी या ठिकाणावर आणि किंद्रातिवका या भागांवर ताबा मिळवला आहे. त्यासह पुर्व युक्रेनच्या रिडकोडुब गावावरही नियंत्रण मिळवले आहे. 

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया आता शांत बसणार नाही. रशिया आता संपूर्ण ताकदिनिशी प्रत्युत्तर देणार. रशियाने आता युक्रेनच्या सीमेअंतर्गत घुसखोरी करण्यास सुरूवात केली आहे. युक्रेनच्या ज्या दोन भागांवर नियंत्रण मिळवले गेले आहे, त्याला आता ‘बफर झोन’ बनवण्याची रणनीती आखण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे रशियावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना ते सुरक्षित करू शकतील. गेल्या काही आठवड्यापासून रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या काही गावांमधील रहिवाशी भागात बरेच नुकसान झाले आहे. मात्र युक्रेनने याला अधिकृत मान्यता दिलेली नाही. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!