Tukaram Mundhe News : गेले काही महिने अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये धडक कारवाईंचा सपाटा लावून, आयुक्त तुकाराम मुंढे हे चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर नेहमीच मतमतांतरे ऐकू येत असतात. एफडीए प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार करून मुंढे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. काय आहेत हे आक्षेप जाणून घ्या.
मुंबई : 31-07-2026
पुणे, मुंबईसह राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून (Tukaram Mundhe News) सध्या अनेक ठिकाणी कडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कारवाया पार पाडल्या जात आहे. या कारवाईमुळे जनता खुश आहे. मात्र, त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बंड पुकारले आहे.
एफडीए प्रयोगशाळेतील या सर्वांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार करून मुंढे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. यामध्ये त्यांनी आवश्यक मनुष्यबळाशिवाय दोन शिफ्ट सुरू कऱण्यात आल्याचे म्हटले आहे. रिक्त पदे न भरल्याने सध्या कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो, त्यावर कार्यवाही करावी. तसेच सकाळी 9 ते 12 पर्यंत काम करण्याचा दबाव दिला जातो. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीतही कामाचे आदेश दिले जात आहेत.
याशिवाय, अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक, संसाधनांची कमतरता आहे. नमुम्यांची तपासणी घाईत करण्याचा दबाव, त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आयपी, बीपी आणि युएसपी मानकांनुसार तपासणीसाठी आवश्यक वेळ दिला जात नसल्याची तक्रारही या अधिकाऱ्यांनी केली आहे.
तक्रारपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांचीही सही (Tukaram Mundhe News)
या तक्रारपत्रकावर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. तक्रारीनुसार, प्रयोगशाळेत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू कऱण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात किर्त पदे असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
हायकोर्ट आवारातील कँटीनवरच कारवाई (Tukaram Mundhe News)
मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईसंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यापाठोपाठ एफडीएचे पथक गुरूवारी उच्च न्यायलयाच धडकले. कोर्टाच्या आवारातील उपहारगृहांची तपासणी केली असताना एका कँटिनने परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. नोंदणी नसलेल्या उपहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. एफडीएने हायकोर्ट आवारातील कँटीनची तपासणी केल्याने या कारवाईची चर्चा रंगली आहे.