Shivsena Mns Protest : गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. ही अफवा आहे की सत्य हे तर अजून निश्चित झालेले नाही. मात्र उद्या मुंबईत हे दोन्ही पक्ष आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत.
मुंबई : 2025-06-17
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. या युतीबाबात समस्त महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता आहे. मात्र या फक्त चर्चा आहेत की ते सत्यात उतरणार हे आणखी गुलदस्त्यात आहे. मात्र आता या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाचे आंदोलन होणार आहे.
मनसे आणि ठाकरे गट इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन( Shivsena Mns Protest ) करणार आहेत. उद्या (बुधवारी ) 11 वाजता प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यलयासमोर हो आंदोलन होणार आहे. भारतीय कामगार सेेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, मनसे वरळी विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे.
कार्यकर्त्यांची भावना
दोन्ही पक्ष एकत्र येणार का ? या चर्चा सध्या दोरात असताना हे आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्यांनी एकत्र यावे असेच आहे. वेळोवेळी त्यांनी आपली ही भावना व्यक्त केली आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते मिळून रस्त्यावर एकत्र आंदोलन करणार आहे.
Leave a Reply